Sushant Singh Rajput Movies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput Birth Anniversary: सुशांत सिंह राजपूतला आजही विसरू शकले नाही चाहते; 'या' चित्रपटांनी दिली सुशांतच्या आयुष्याला कलाटणी...

Chetan Bodke

Sushant Singh Rajput Movies

बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)चा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी पाटणा येथे झाला. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत त्याच्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याच्या अचानक एक्झिटने अवघी चित्रपटसृष्टी हळहळली होती. एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नेहमीच सुशांत सिंह चाहत्यांच्या स्मरणात आहे. जरीही सुशांत आज आपल्यात नसला तरी, त्याच्या आठवणी कायमच चित्रपटांच्या माध्यमातून जिवंत आहे. त्याचे काही चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. आज अभिनेता जरीही आपल्यात नसला तरीही त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून तो आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.

सुशांत सिंह राजपूतने त्याच्या सिनेकारकिर्दीची सुरुवात एका टिव्ही सिरीयलमधून झाली होती. सुशांत 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत प्रकाश झोतात आला. 'जरा नच के देखा' आणि 'झलक दिखला जा' यासारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सुशांतने आपली झलक दाखवत बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त काही चित्रपटांमध्येच काम केले आहे. चला तर जाणून घेऊया, त्याच्या उत्कृष्ट भूमिकेंबद्दल.

kai po che

काय पो छे (Kai Po Che)

अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काई पो चे' हा सुशांतचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाची कथा चेतन भगतच्या 'द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात सुशांतने एका अपयशी क्रिकेटरच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. त्याने आपल्या अप्रतिम भूमिकेने चाहत्यांची मने जिंकले.

M.S.Dhoni: The Untold Story

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (M.S.Dhoni: The Untold Story)

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या बायोपिकमध्‍ये सुशांत सिंहने क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीचे पात्र साकारले होते. त्याने साकारलेल्या भूमिकेचे आणि अभिनयाचे सर्वच स्तरावर कौतुक झाले.

Kedarnath

केदारनाथ (Kedarnath)

केदारनाथ या रोमँटिक आणि सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये सुशांतने मंसूर नावाचे पात्र साकारले होते. चित्रपटामध्ये सुशांतसोबत सारा अली खान सुद्धा दिसली होती.

Chhichhore

छिछोरे (Chhichhore)

सुशांत सिंग राजपूतने अनिरुद्ध पाठक नावाच्या एका इंजिनियर तरुणाचे पात्र चित्रपटामध्ये साकारले होते. नितेश तिवारी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनिरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या ह्या प्रयत्नानंतर आयुष्यात मोठे वळण येते. या चित्रपटात प्रेक्षकांना कॉमेडी-ड्रामा दाखवला आहे.

Dil Bechara Film

दिल बेचारा (Dil Bechara)

सुशांत सिंग राजपूतचा हा अखेरचा चित्रपट ठरला. त्याने कॅन्सर सपोर्ट ग्रुपला सपोर्ट करणाऱ्या किझीच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या कॅन्सर पेशंट मॅनीची भूमिका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT