Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्ना डीपफेक प्रकरणी आरोपीला अटक, अभिनेत्रीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली...

Rashmika Mandanna Deepfake Video: दिल्ली पोलिस (Delhi Police) गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आता याप्रकरणी रश्मिका मंदान्नाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Rashmika Mandanna
Rashmika MandannaSaam TV
Published On

Rashmika Mandanna On Deepfake Video:

गेल्या काही दिवसांपासून डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) आणि फोटोंनी बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचे टेन्शन वाढवले आहे. अनेक सेलिब्रिटी डीपफेकचे शिकार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याप्रकरणी रश्मिका मंदान्नाने पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिस (Delhi Police) गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आता याप्रकरणी रश्मिका मंदान्नाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे डीसीपी हेमंत तिवारी यांनी रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओ प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. यानंतर रश्मिका मंदान्नाने आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर याप्रकरणावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिकाने दिल्ली पोलिसांच्या कामिगिरीचे कौतुक केले आहे.

तिने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'या प्रकरणात जबाबदार असलेल्यांना अटक केल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे खूप खूप आभार. या काळात माझ्या पाठीशी नेहमी ढाल बनून उभे राहिलेल्या लोकांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत. सर्व मुला-मुलींनी ऐकावे, जर तुमचा फोटो कोणत्याही प्रकारे तुमची प्रतिमा डागाळण्यासाठी वापरला जात असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे की तुमच्या आजूबाजूला अनेक चांगले लोक तुमच्या पाठीशी आहेत. जे तुम्हाला मदत करतील.'

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने रश्मिका मंदान्नाचा हा डीपफेक व्हिडिओ बनवला होता तो आंध्रप्रदेशचा रहिवासी आहे. आरोपीचे नाव नवीन असल्याचे सांगण्यात येत आहे. याच २४ वर्षीय आरोपीने साऊथची सुपरस्टार रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ तयार करून तिची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याप्रकरणी रश्मिका मंदान्नाने पोलिसांची मदत मागितली होती आणि 10 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी देखील तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. आता पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आरोपीने फॉलोअर्स वाढवण्यासाठी रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडीओ तयार केला असल्याची माहिती पोलिस चौकशीदरम्यान दिली.

Rashmika Mandanna
Main Atal Hoon 2nd Day Collection: अटलजींच्या बायोपिकची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; ‘मैं अटल हूं’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओजनंतर आलिया भट्ट, काजोल, सचिन तेंडुलकर, शुभमन गिल, सोनू सूद आणि आता नोरा फतेही यांचे डीपफेक व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी उघडपणे बोलत आहेत आणि ते हे प्रकरण खूप गंभीरपणे घेत आहेत. रश्मिका मंदान्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रश्मिका मंदान्ना सध्या संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. सध्या रश्मिका 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Rashmika Mandanna
Ayodhya Pran pratistha: २२ जानेवारीला बॉलिवूडलाही सुट्टी; प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तब्बल १०० चित्रपटांच्या शुटिंगला ब्रेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com