Ayodhya Pran pratistha: २२ जानेवारीला बॉलिवूडलाही सुट्टी; प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तब्बल १०० चित्रपटांच्या शुटिंगला ब्रेक

Holiday For Bollywood : प्राणप्रतिष्ठानिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलीय. या खास प्रसंगी बॉलिवूड इंडस्ट्रीलाही सुट्टी देण्यात आलीय. माध्यमांच्या वृत्तानुसार, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी १०० चित्रपटांचे शुटिंग होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
Ram Mandir Consecration Ceremony
Ram Mandir Consecration CeremonySocial Media
Published On

Shooting Of Around 100 Films Break On Ram Mandir Consecration Ceremony :

सोमवारी २२ जानेवारीला अयोध्यामधील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तर काही राज्यांमध्ये अर्धादिवस सुट्टी जाहीर करण्यात आलीय. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडला देखील सुट्टी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest News)

सोमवारी २२ जानेवारीला अयोध्यामधील राम मंदिरात (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा (Pran pratistha) होणार आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तर काही राज्यांमध्ये अर्धादिवस सुट्टी जाहीर करण्यात आलीय. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडला (Bollywood) देखील सुट्टी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (Federation of Western India Cine Employees) सोमवारची राष्ट्रीय सुट्टी घोषित केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एफडब्ल्यूआयसीईचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी आपल्या निवेदनात ही घोषणा केली. आम्ही या विशेष प्रसंगी सुट्टी जाहीर करतोय की, या दिवशी कोणत्याही चित्रपटाचे (film) चित्रीकरण( Filming) होणार नाही कारण आमचे सर्व कार्यकर्ते सुट्टीवर असतील, असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. इमरजन्सी असेल किंवा कोणाचे मोठे नुकसान होत असेल तर वैध कारणासह विनंती पत्र द्यावे लागेल. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊनच शूटिंगला परवानगी देण्यात येईल, असेही इवारी म्हणाले.

अयोध्येतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तुम्‍हाला याचा पुरेपूर आस्‍वाद घेता, यावा यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आलीय. अयोध्येतून या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण ७० हून अधिक शहरांतील १६० हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जाणार आहे. त्याचे शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. हे थेट प्रक्षेपण तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात १०० रुपयांमध्ये पाहू शकता.

Ram Mandir Consecration Ceremony
Ram Temple: रामलल्लाचे फोटो लीक कसे झाले? तपास करा; राम मंदिराच्या प्रमुख पुजारींची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com