Ram Temple: रामलल्लाचे फोटो लीक कसे झाले? तपास करा; राम मंदिराच्या प्रमुख पुजारींची मागणी

Ram Lalla Idol Photo : रामलल्लाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख पुजारी दास नाराजी झाले आहेत. प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. परंतु त्याआधीच त्यांच्या मूर्तीच्या डोळ्यावरून पट्टी काढणे हे योग्य नसल्याचं आचार्य सत्येंद्र दास म्हणालेत.
 Acharya Satyendra Das
Acharya Satyendra DasANI
Published On

Ram Temple Chief Priest Reaction On Ram Lalla Idol Photo Leaked :

सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे. परंतु मूर्तीच्या अभिषेकाआधीच रामलल्लाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी नाराजी व्यक्त केलीय. शनिवारी सोशल मीडियावर रामलल्लाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देत आचार्य सत्येंद्र दास यांनी नाराजी व्यक्त केली. रामलल्लाचे फोटो लीक कसे झाले याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. (Latest News)

प्रभू रामाच्या (Lord Ram) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. परंतु त्याआधीच त्यांच्या मूर्तीच्या डोळ्यावरून पट्टी काढणे हे योग्य नसल्याचं दास म्हणालेत. जर अशाप्रकारे मूर्तीचे फोटो व्हायरल होत असतील तर त्याचा तपास केला गेला पाहिजे. अभिषेकपूर्वी रामलल्लाचा फोटो लीक झाल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केलीय. श्री. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने गंभीर दखल घेत फोटो लीक करणाऱ्याला शोधून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामलल्लाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यामागे मंदिराचे बांधकाम करणाऱ्यांचा हात असल्याचा संशय ट्रस्टला आहे. रामलल्लाचे फोटो व्हायरल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ट्रस्टने केली आहे. दरम्यान रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील काळ्या पाषाणापासून बनवण्यात आलीय. काळ्या पाषाणापासून बनवण्यात आलेली ५१ इंचांच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिल्पकार अरूण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केलीय.

 Acharya Satyendra Das
Ram Mandir: प्रभू रामाची मूर्ती काळ्या रंगाचीच का? शिल्पकाराच्या पत्नीनं सांगितलं त्यामागील कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com