Ram Mandir: प्रभू रामाची मूर्ती काळ्या रंगाचीच का? शिल्पकाराच्या पत्नीनं सांगितलं त्यामागील कारण

Lord Rama Idol : रामाची मूर्ती काळ्या रंगाची का आहे, याचं उत्तर शिल्पकार अरुण योगीराज यांची पत्नी विजेता योगीराज यांनी दिलं आहे. मूर्तीसाठी काळ्या पाषाणाची (कृष्ण शिला) निवड करण्यामागे एक मोठं रहस्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Lord Rama Idol
Lord Rama IdolSaam Tv
Published On

Why Ayodhya Ram Mandir Lord Ram Idol In Black :

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. काल प्रभू श्रीरामच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये व्हायरल झाले. प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान झाली असून त्यांच्या अभिषेकाशी संबंधित कार्यक्रम सुरू आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाचीच (कृष्ण शिलामध्ये) का असं प्रश्न अनेकांना पडलाय. (Latest News)

रामाची मूर्ती काळ्या रंगाची का आहे, याचं उत्तर शिल्पकार अरुण योगीराज यांची पत्नी विजेता योगीराज यांनी दिलं आहे. मूर्तीसाठी काळ्या पाषाणाची (कृष्ण शिला) निवड करण्यामागे एक मोठं रहस्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या कृष्ण शिलामध्ये असे गुणधर्म आहेत, ज्यामुळे दुधाचे कोणतेच परिणाम होत नाहीत. आपण देवाला दुधाचा अभिषेक करतो किंवा मूर्तीला दूध अर्पण करत असतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुधातील घटकांचा मूर्तीवर कोणताच परिणाम होत नसल्याने कृष्ण शिला मूर्तीसाठी वापरण्यात आलीय. या कृष्ण शिला म्हणजेच काळ्या पाषाणावर कोणत्याही ऍसिड किंवा आग किंवा पाण्याचा परिणाम होत नाही. हजारो वर्षापर्यंत ही मूर्ती अशाच प्रकार दिसेल असं शिल्पकार एका वृत्त माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. दरम्यान, काळे पाषाण हे कॉन्ट्रास्ट करून मूर्तीचे सौंदर्य वाढवत असतात.

असा होता आहार

शिल्पकार विजेता योगीराज यांनी सांगितले की, त्यांनी मूर्ती तयार करण्याच्या संपूर्ण कालावधीत अरुण योगीराज यांनी सहा महिने सात्विक आहार घेतला. अरुणने बनवलेल्या रामललाच्या मूर्तीची अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापनेसाठी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विजेता म्हणाल्या, आम्ही याचा कधी विचारही केला नव्हता. पण अरुणकडे खूप प्रतिभा आहे. त्याच्या कलेची जगभरात ओळख आणि कौतुक व्हायला हवं.

Lord Ram
Lord RamSaam Tv

अशी आहे प्रभू रामाची मूर्ती

मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे १० अवतार

प्रभू रामाच्या मूर्तीभोवती बांधलेल्या मूर्तीमध्ये रामाचे १० अवतार पाहायला मिळतात. यामध्ये प्रथम मत्स, दुसऱ्यावर कूर्म, तिसऱ्या क्रमांकावर वराह, चौथ्या क्रमांकावर नरसिंह, पाचव्या क्रमांकावर वामन, सहाव्या क्रमांकावर परशुराम, सातव्या क्रमांकावर राम, आठव्या क्रमांकावर कृष्ण, नवव्या क्रमांकावर बुद्ध आणि कल्कि दिसतो. यासोबतच एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड विराजमान आहेत.

मूर्तीवरील चिन्ह

रामलल्लाच्या मूर्तीभोवती बनवलेल्या कलाकृतीत अनेक खास प्रतिमा आहेत. या चिन्हांचे नेमके काय महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

  • सूर्यदेव -सूर्यदेव हे रामाच्या वंशाचे प्रतीक आहे. यासोबतच सूर्याला शिस्तीचे प्रतीक मानले जाते. प्रभू रामाचे चरित्र सूर्यदेवतेप्रमाणे स्थिर आहे.

  • शेषनाग- शेषनाग हे भगवान विष्णूच्या शय्येचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.

  • ओम- ओम ही या विश्वातील पहिले अक्षर आहे आणि तो सूर्यचा आवाज देखील मानला जातो.

  • गदा- गदा हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. रामाचा संकल्प त्याच्या गदेसारखा मजबूत आहे. त्यामुळेच रामाच्या मूर्तीमध्ये गदा दाखवण्यात आली आहे.

  • स्वस्तिक- हे आपल्या संस्कृतीचे आणि वैदिक परंपरेचे प्रमुख प्रतीक आहे. प्रभू राम हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत.

  • आभा- भगवान रामाच्या चेहऱ्यामागे निर्माण झालेली आभा संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे.

  • धनुष्य – हे केवळ शस्त्र नाही, धनुष्य हे मुळात भगवान रामाच्या शिक्षणाचे आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे.

Lord Rama Idol
Ram Murti Ayodhya: सुंदर रूप मनोहर....प्रतिष्ठापनेच्या आधी श्रीरामाचं घडलं दर्शन, पाहा 5 मिनिटांचा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com