Main Atal Hoon 2nd Day Collection: अटलजींच्या बायोपिकची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; ‘मैं अटल हूं’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

Main Atal Hoon Box Office Collection: रवी जाधव दिग्दर्शित ‘मैं अटल हूं’ चित्रपटाने दोन दिवसांत २ कोटी ९५ लाखांच्या आसपासची कमाई केली आहे.
Main Atal Hoon Box Office Collection
Main Atal Hoon Box Office Collection Instagram
Published On

Main Atal Hoon 2nd Day Box Office Collection

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) बहुप्रतिक्षित 'मैं अटल हूं' चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. दोन दिवसामध्ये चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांसह सेलिब्रिटींकडून आणि समीक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक केले आहे. नुकतंच चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्याही कमाईचा आकडा समोर आला आहे, चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल (Bollywood Film)

Main Atal Hoon Box Office Collection
Ayodhya Pran pratistha: २२ जानेवारीला बॉलिवूडलाही सुट्टी; प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तब्बल १०० चित्रपटांच्या शुटिंगला ब्रेक

रवी जाधव दिग्दर्शित चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. पंकज त्रिपाठींनी चित्रपटामध्ये स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पात्र साकारले आहे. अटलजींच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत २ कोटी ९५ लाखांच्या आसपासची कमाई केली आहे. (Bollywood News)

नुकतंच सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी चित्रपटाने १ कोटी ९५ लाखांची कमाई केली आहे. उत्कृष्ट कथानक, दमदार स्टारकास्ट आणि उत्तम अभिनय अशी सांगड घातलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा होती, पण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक ओपनिंग केलेली नाही. (Atal Bihari Vajpayee)

Main Atal Hoon Box Office Collection
Upcoming Bollywood Movies: 'फायटर' ते 'सिंघम अगेन', २०२४ मध्ये कोण-कोणते चित्रपट होणार रिलीज; संपूर्ण यादीच आली समोर...

चित्रपटामध्ये अटलजींचे बालपणीचे दिवस, राजकीय कारकीर्द, बदल घडवून आणण्यासाठी, भारताला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटात पंकज त्रिपाठींसह अनेक कलाकारांनी काम केले आहे. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओजच्या पाठिंब्याने या चित्रपटाची पटकथा ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे. तर सलीम-सुलेमान यांनी मनोज मुंतशिर यांनी संगीत दिले आहे. (Entertainment News)

Main Atal Hoon Box Office Collection
Mirzapur 3 Series Story Reveal: भौकाल ! ‘मिर्झापूर ३’ चाहत्यांची झोप उडवणार; रिलीज आधी कथानक आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com