Death News SAAM TV
मनोरंजन बातम्या

Death News : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Famous Actor Mother Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन झाले आहे. अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

अभिनेत्याच्या आईचे निधन

अभिनेत्याने केली भावुक पोस्ट

बॉलिवूड आणि टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता मनीष पॉलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनीष पॉल यांच्या आईचे निधन झाले आहे. मनीषने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही बातमी शेअर केली आहे. मनीष पॉलची आई आई उर्मिल यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ८ जुलै २०२६ रोजी त्यांचे निधन झाले.

मनीष पॉलने सोशल मीडियावर आईसोबतचे खास फोटो शेअर केले असून त्याला भावुक कॅप्शन लिहिलं आहे. कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरच्या माध्यमातून मनीष पॉलच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच चाहते या कठीण काळात अभिनेत्याला खंबीर पाठिंबा देताना दिसत आहेत. मनीष अनेकदा आईसोबतचे खूप खास फोटो शेअर करायचा.

मनीष पॉलची पोस्ट

"आज जग शांत वाटतंय.

आज सकाळी, मी माझ्या आईचा निरोप घेतला... माझे पहिले घर, माझा सर्वात मोठा आराम आणि मी आतापर्यंत ओळखलेली सर्वात मजबूत स्त्री.

माझ्यासाठी तुमचे काय महत्त्व आहे किंवा तुझ्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी, हे शब्दांत खरोखरच मांडता येणार नाही.

पण मी तुझे प्रेम, तुझी शक्ती, तुझी दयाळूपणा आणि तू मला दिलेला प्रत्येक धडा घेऊन जगतो. ते आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.

मला आशा आहे की तुला आता शांती मिळाली...

केवळ आईच जसे प्रेम करू शकते, तसे माझ्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.

पुन्हा भेटेपर्यंत.

तुझ्यावर सदैव प्रेम आहे..."

मनीष पॉल करिअर

मनीष पॉल हा अभिनयासोबत एक उत्तम होस्ट देखील आहे. त्याने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. मनीष अलिकडेच 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात दिसला होता. ज्यात त्याने वरुण धवनसोबत काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT