Shruti Vilas Kadam
गुलाबजल तयार करण्यासाठी सर्वप्रथम ताजी आणि सुगंधी गुलाबाची फुले घ्या. फुलांमधील पाकळ्या वेगळ्या करून स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्या.
स्वच्छ केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या एका मोठ्या भांड्यात पसरवून ठेवा. पाकळ्यांमधील धूळ आणि घाण पूर्णपणे निघाली आहे याची खात्री करा.
आता पाकळ्या ठेवलेल्या भांड्याच्या अगदी मध्यभागी एक छोटी रिकामी वाटी ठेवा. ही वाटी गुलाबजल जमा करण्यासाठी वापरली जाणार आहे.
आता भांड्यात इतके पाणी घाला की गुलाबाच्या पाकळ्या पूर्णपणे पाण्यात बुडतील. मात्र, मध्यभागी ठेवलेल्या छोट्या वाटीत पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.
भांड्यावर उलटे झाकण ठेवा. त्यावर बर्फाचे काही तुकडे ठेवा. यामुळे तयार होणारी वाफ लवकर थंड होऊन पाण्याचे थेंब तयार होण्यास मदत होते.
आता भांडे गॅसवर ठेवून मंद ते मध्यम आचेवर साधारण २० ते २५ मिनिटे गरम करा. गुलाबाच्या पाकळ्यांमधून तयार झालेली वाफ झाकणावर थंड होऊन थेंब-थेंब मध्यभागी ठेवलेल्या वाटीत जमा होईल.
वाटीत जमा झालेले पाणी म्हणजे घरगुती गुलाबजल. याचा वापर फेस टोनर, फेसपॅक, त्वचेला थंडावा देते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.