Shruti Vilas Kadam
'ईठा' चित्रपटातील श्रद्धा कपूरने क्रीम आणि सोनेरी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. साडीवरील सोनेरी नक्षीकाम तिच्या लूकला खास पारंपरिक स्पर्श देत आहे.
साडीला गडद गुलाबी रंगाचा पदर आणि सुंदर सोनेरी बॉर्डर आहे. क्रीम आणि गुलाबी रंगाचे हे कॉम्बिनेशन तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
श्रद्धाच्या डोक्यावर पारंपरिक आणि नक्षीदार सोन्याचा उंच मुकुट पाहायला मिळतोय. त्यावरील लाल खडे आणि सुंदर कलाकुसर तिच्या शाही लूकमध्ये भर घालत आहे.
केसांमध्ये दोन्ही बाजूंना गुलाबी रंगाची सुंदर फुले माळलेली दिसतात. पारंपरिक केशरचना आणि फुलांची सजावट तिच्या लावणी लूकला खास बनवत आहे.
गळ्यात अनेक पदरी सोन्याचे हार, मोठे कानातले, नथ आणि हातात सोन्याच्या बांगड्या असा दागिन्यांचा साज तिने केला आहे. कमरेला पारंपरिक सोन्याचा कमरपट्टाही आहे.
कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली, डोळ्यांमध्ये गडद काजळ आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक असा तिचा मेकअप आहे. या मेकअपमुळे तिच्या चेहऱ्याला पारंपरिक लावणीचा साज आला आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित भूमिका साकारत आहे. 'ईठा' हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.