Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Famous Actor Hospitalized : प्रसिद्ध अभिनेत्याला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विषारी किडा चावला, ज्यामुळे अभिनेत्याची प्रकृती बिघडली. अभिनेता आता रुग्णालयात उपचार घेत आहे.
Famous Actor
Famous Actorsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेता रुग्णालयात दाखल

प्रकृती चिंताजनक

शूटिंगदरम्यान चावला विषारी किडा

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता रुग्णालयात दाखल आहे. प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किडा चावल्याने ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांना कोलकातामधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना रामोजी फिल्म सिटीमध्ये घडली. अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जी यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनातून अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे.

telegraphindia च्या वृत्तानुसार, राजेश शर्मा यांच्यासोबत ही घटना दिवसाचे चित्रीकरण संपल्यानंतर घडली. अभिनेते घनदाट झाडी असलेल्या परिसरात स्थानिक तंत्रज्ञांसोबत वेळ घालवत असताना त्यांना अचानक पायावर काहीतरी चावल्यासारखे वाटले. हा चावा एखाद्या कीटकाचा किंवा विषारी कोळीचा असू शकतो, असा संशय आहे. सुरुवातीला दुखापत गंभीर वाटली नाही, त्यामुळे अभिनेत्याने त्वरित वैद्यकीय मदत न घेता आपले शूटिंग सुरू ठेवले. मात्र काही तासांनी अभिनेत्याच्या उजव्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांची प्रकृती हळूहळू खालावली तेव्हा ते कोलकात्याला गेले. विमानाने प्रवास करताना तीव्र ताप आला आणि अस्वस्थता वाढली.

Famous Actor
Famous Actress : "पीरियड्स आले पण वॉशरूमला जायचीही सोय नाही..."; प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तब्बल ९ तास अडकली | VIDEO

राजेश शर्मा यांना कोलकात्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या उजव्या पायाला गंभीर संसर्ग झाला आहे. त्यांना तीव्र ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याचेही समजते. संसर्ग पायाच्या बोटांपासून गुडघ्यापर्यंत वेगाने पसरला आहे. तसेच पायांना फोड आले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग वाढला तर रक्ताची गुठळी होऊ शकते. तसेच संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास जीवघेणी ठरू शकते. सध्या आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत.

राजेश शर्मा यांची प्रकृती बिघडल्याची समजताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. राजेश शर्मा अलिकडेच 'भूल भुलैया ३' मध्ये झळकले. राजेश शर्मा यांनी हिंदी, बंगाली आणि साऊथ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Famous Actor
Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीच्या बायोपिकचा फर्स्ट लूक समोर, कोण साकारतंय मुख्य भूमिका? चित्रपटाची रिलीज डेट काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com