

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर 10 दिवसांनी पतीनेही प्राण गमवाले.
जेवणानंतर दोघांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे
गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या बागलाणातील आखतवाडे येथे ह्याळीज नावाच्या शेतकरी दाम्पत्यानी रात्रीच्या जेवणात चिकन खाल्लं. त्यानंतर दही खाल्लं होतं, त्यानंतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विषबाधा प्रकरणाचे गुढ आणखी वाढले आहे. या दोघांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावातील ह्याळीज दाम्पत्याने रविवार २८ रोजी रात्रीच्या जेवणात चिकन खाल्लं. त्यानंतर दही खाल्ली, पण यानंतर वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान ६८ वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा मृत्यू झाला.
तर त्यांचे पती शांताराम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढणे जिल्हा वैद्यकीय प्रशासनापुढे आव्हान बनलंय.
या घटनेनंतर सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे अन्न आणि औषध प्रशासनाची टीम दाखल झाली होती. टीमकडून संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे सॅम्पल संकलितही करण्यात आले होते. मात्र अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाहीये. चिकनमुळे विषबाधा झाली की इतर कोणत्या खाद्यपदार्थामुळे याचा तपास सुरु करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती, अन्न तयार करण्याची प्रक्रिया आणि वापरलेल्या साहित्याची माहिती प्रशासनाकडून पडताळली जातेय.
या विषबाधेच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. विषबाधा चिकनमुळे झाली की दहीमुळे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते बहुतेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. दरम्यान अशाच एक घटना मुंबईत घडली होती. पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.