Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीच्या बायोपिकचा फर्स्ट लूक समोर, कोण साकारतंय मुख्य भूमिका? चित्रपटाची रिलीज डेट काय?

Rajkummar Rao : सौरव गांगुलीच्या बायोपिकचा फर्स्ट लूक समोर आला असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार झळकणार आहे. चित्रपटाची रिलीज डेटही जाणून घ्या.
Rajkummar Rao
Sourav Ganguly Biopicsaam tv
Published On
Summary

सौरव गांगुलीच्या बायोपिकचा फर्स्ट लूक समोर

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

सौरव गांगुली यांचा आज वाढदिवस आहे.

'दादा - द सौरव गांगुली स्टोरी' (Dada - The Sourav Ganguly Story) या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपट माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सौरव गांगुली यांची भूमिका बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता साकारणार आहे. आज (८ जुलै २०२६) सौरव गांगुली यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त चाहत्यांना हे मोठे सरप्राइज देण्यात आले आहे.

'दादा' चित्रपटात सौरव गांगुली यांच्या भूमिकेत अभिनेता राजकुमार राव झळकणार आहे. चित्रपटातील त्याचा 'फर्स्ट लूक ' प्रदर्शित केला आहे. जो पाहून चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आमच्या अत्यंत लाडक्या दादाला (सौरव गांगुली) वाढदिवसाच्या शुभेच्छा..." या पोस्टरवर चाहते, नेटकरी आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

'फर्स्ट लूक' पोस्टरमध्ये राजकुमार राव, सौरव गांगुलीच्या त्या ऐतिहासिक 'जर्सी फिरवण्याच्या' कृतीची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे. २००२ च्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर भारताने मिळवलेल्या अविस्मरणीय विजयानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत गांगुलीने हा जल्लोष केला होता. पोस्टरमधून राजकुमार रावच्या अभिनयाची एक झलक पाहायला मिळत आहे.

'दादा' चित्रपटाची रिलीज डेट

नवीन वर्षात 'दादा - द सौरव गांगुली स्टोरी' हा चित्रपट रिलीज होत आहे. चित्रपटाची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे. राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेला 'दादा' हा चित्रपट १४ मे २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

Rajkummar Rao
Famous Actress : "पीरियड्स आले पण वॉशरूमला जायचीही सोय नाही..."; प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तब्बल ९ तास अडकली | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com