Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; लग्नाच्या २ वर्षांनी घरी हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला VIDEO

Marathi Actress Pregnancy Announcement : मराठी प्रसिद्ध अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून अभिनेत्रीने ती आई होणार असल्याचे सांगितले.
Marathi Actress Pregnancy Announcement
Famous Actresssaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई

लग्नाच्या २ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केली गुडन्यूज

बेबी बंप फ्लॉन्ट करत व्हिडीओ केला शेअर

मराठी मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवऱ्यासोबत रोमँटिक व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्वरदा ठिगळे आणि सिद्धार्थ राऊतने मार्च २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली.

स्वरदाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती नवऱ्यासोबत समुद्रकिनारी फेरफटका मारताना दिसत आहे. त्यानंतर तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत चाहत्यांना प्रेगनेंसी गुडन्यूज दिली आहे. स्वरदाने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दोघांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "Some love stories create memories, Ours created a heartbeat, baby Coming soon..."

अभिनेत्री स्वरदा ठिगळे आजवर अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. यात 'माझे मन तुझे झाले', 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत दिसली. स्वरदा ठिगळेने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमुळे स्वरदाला खूप लोकप्रियता मिळाली. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत स्वरदाने तेजश्रीची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री स्वरदाचा नवरा सिद्धार्थ राऊत हा डिझायनर आहे. स्वरदाने २०१३ मध्ये आलेल्या 'माझे मन तुझे झाले' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेमध्ये तिने शुभ्राची भूमिका साकारली होती. तिने २०१७ मध्ये 'सावित्री देवी कॉलेज' या हिंदी मालिकेतही काम केले.

Marathi Actress Pregnancy Announcement
Famous Actress : "त्याने पाठलाग केला अन्..."; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री भयंकर घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com