Suraj chavan: कॉलर उडवतं हटके स्टाईलमध्ये सुरज चव्हाणने दिली गुडन्यूज; म्हणाला, 'मी बाबा होणार...'

Suraj chavan : बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता सुरजने एक व्हिडिओ करुन ही गुड न्यूज सगळ्यांना दिली आहे.
Suraj chavan
Suraj chavanSaam tv
Published On

Suraj chavan : 'बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कोणत्याही रिअॅलिटी शोमुळे किंवा नव्या कामामुळे नव्हे, तर त्याच्या आयुष्यातील आनंदाच्या बातमीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती समोर आली असून चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अलीकडेच अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’मधील स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये संजनाचा पारंपरिक ‘चोर ओटी’ कार्यक्रम दिसून येत आहे. या समारंभात कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. व्हिडिओ शेअर करताना जान्हवीने सूरज आणि संजनाला शुभेच्छा देत त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे म्हटले आहे.

Suraj chavan
Sunny Leone: २४०० कोटी रुपयांचा घोटाळा; सनी लिओनीला CIDची नोटीस

यापूर्वीही संजनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये तिचा बेबी बम्प पाहायला मिळाल्याने सूरज लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता समोर आलेल्या नव्या व्हिडिओमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. त्याने एक व्हिडिओ करत एटीत कॉलर उडवतं म्हटले, "नमस्कार जय महाराष्ट्र. तुमचा सूरज भाऊ आज लय खूश आहे. लय आनंदात आहे. टॉपचा किंग तुमचा बाबा होणारे म्हणजेच तुमचा सूरज चव्हाण देणार धप्पा, टॉपचा किंग होणार पप्पा.' तसेच या व्हिडिओवर त्याने मी बाबा होणार असे कॅप्शन दिले आहे.

Suraj chavan
Pranit More: 'बिर्याणी मिळेल, कंसेंट नाही'; प्रणित मोरेच्या '३७० बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची एन्ट्री

सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’चे विजेतेपद पटकावत राज्यभरात मोठी लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडले. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याने बालमैत्रीण संजना गोफणे हिच्यासोबत विवाह केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com