Pranit More: 'बिर्याणी मिळेल, कंसेंट नाही'; प्रणित मोरेच्या '३७० बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची एन्ट्री

Pranit More: प्रणित मोरे यांच्या शोतील ‘३७० बिर्याणी’ वादावर मुंबई पोलिसांनी संमतीबाबत जनजागृती करणारी पोस्ट शेअर केली. #BiryaniIsNotConsent हॅशटॅगसह ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
Pranit More
Pranit MoreSaam Tv
Published On

Pranit More: बिग बॉस फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टँड-अप शोमधील ‘३७० ची बिर्याणी’ या चर्चित वादाने आता नवीन वळण घेतले आहे. सोशल मीडियावर गाजत असलेल्या या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनीही एन्ट्री घेतली आहे.या वादावर मुंबई पोलिसांनी एक पोस्ट तयार करत जनजागृती करणारा एक संदेश दिला आहे. ‘संमती’ (Consent) या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारी मुंबई पोलिसांची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पांढऱ्या बॅकग्राऊंडवर मोठ्या अक्षरांत ‘३७०’ असा आकडा दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे ‘०’ या अंकाच्या जागी बिर्याणीच्या प्लेटचे चित्र वापरण्यात आले होते. त्यावर लिहिले होते, “३७० रुपयांत तुम्हाला बिर्याणीची एक प्लेट मिळते. पण, लॉक-अपमध्ये वेळ घालवला, तर मोफत जेवण.” पोस्टच्या शेवटी #BiryaniIsNotConsent हा हॅशटॅग वापरला आहे.या पोस्टला “It’s your choice” असे कॅप्शन देण्यात आले होते. कोणाचेही नाव न घेता मुंबई पोलिसांनी संमती आणि महिलांच्या स्वातंत्र्याबाबत महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

Pranit More
Tumbadchi Manjula collection: 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद'नंतर 'तुंबडच्या मंजुळा'ची प्रेक्षकांवर जादू, पाच दिवसात ४ कोटी पार

युजर्सच्या प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले, मुंबई पोलिस ट्रेंडिंग विषयांवर मीम्स करुन लोकांना खूप मस्त त्यांची चूक दाखवतात. आणखी एकाने लिहिलंं ट्रेंडनुसार राहलं तर लोकांना जास्त समजतं' आणखी एकाने लिहिले, म्हणून मला मुंबई पोलिस आपलेसे वाटतात. तर काहींनी पोलिसांनी ट्रेंडिंग विषयांवर मीम्स तयार करण्याऐवजी अधिक गंभीर भूमिका घ्यावी, अशी टीका केली.

Pranit More
Sunny Leone: २४०० कोटी रुपयांचा घोटाळा; सनी लिओनीला CIDची नोटीस

'३७० रुपयांची बिर्याणी' या वादाचे नेमके प्रकरण काय आहे?

प्रणित मोरे यांच्या शोमधील 'क्राउड-वर्क'चा (प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा) एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या क्लिपमध्ये, हिमांशू जांगरा नावाच्या एका व्यक्तीने एका महिलेला बाहेर नेल्याचे आणि चिकन बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने असे विधान केले की, जेवणावर पैसे खर्च केल्यामुळे त्याला त्या बदल्यात लैंगिक संबंधांची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही तर ते पैसे त्याच्यामते फुकटं केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com