Shruti Vilas Kadam
गौरी खानने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये भव्य एंट्री घेतली. तिचा आत्मविश्वास आणि स्टाईल स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रेखाने तिच्या खास पारंपरिक शैलीत कंजिव्हरम साडी नेसली होती. तिची क्लासिक उपस्थिती आणि एलिगन्सने उपस्थितांना भुरळ घातली.
करिना कपूरने पांढऱ्या अनारकली साडीत पारंपरिक आणि आकर्षक लूक सादर केला. तिचा हा सोज्वळ आणि ग्रेसफुल लूक सोशल मीडियावर चर्चेत आला.
सारा अली खान, कृति सॅनन, अनन्या पांडे यांसारख्या तरुण अभिनेत्रींसह बॉलीवूडचे उदयोन्मुख कलाकार पार्टीत रंगले. जुन्या आणि नव्या पिढीचे हे एकत्र आगमन पाहणे उत्साहवर्धक ठरले.
आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, बॉबी देओल यांसारख्या स्टार्सनी पार्टीतील ऊर्जा वाढवली. त्यांच्या उपस्थितीने वातावरण आणखी रंगले.
मनिष माल्होत्रा यांनी पार्टीच्या सजावटीत आणि प्रकाशयोजनेत विशेष कल्पकता दाखवली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीने दिवाळीचा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.