MS Dhoni Request Bobby Deol To Delete Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bobby Deol: धोनीची बॉबी देओलकडे ‘तो’ व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती, दोघांची चॅटिंग व्हायरल

Bobby Deol And MS Dhoni News: बॉबी देओलचे आणि क्रिकेटर धोनीचे व्हॉट्स ॲप चॅटिंग नोटिफिकेशन सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये, क्रिकेटर बॉबीकडे एका गोष्टीची विनंती करताना दिसत आहे.

Chetan Bodke

MS Dhoni Request Bobby Deol To Delete Video

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चित्रपटामध्ये अभिनेता बॉबी देओलला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या ‘जमाल कुडू’ गाण्यावरील डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा बॉबी देओल सध्या एका ट्वीटमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर बॉबी देओलच्या आणि क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीची चॅटिंग मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  (Bollywood)

बॉबी देओलने एक्सवर काही तासांपूर्वी एक स्क्रिनशॉट शेअर केलेला आहे, ज्यामध्ये क्रिकेटर धोनी बॉबीला “बॉबी, तो माझा व्हिडीओ कृपया करून डिलीट कर ना… तो व्हिडीओ खूपच लाजिरवाणा आहे.” असं मेसेज केलेला दिसत आहे. बॉबी देओलचे हे व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन एक्सवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावर बॉबी देओलने धोनीला “माही भावा, ठीक आहे मी डिलीट करतो” असं उत्तर दिलं आहे. तो स्क्रिनशॉट शेअर करताना बॉबीने “लीक कर दू क्या” असा हॅशटॅगही वापरला आहे.

दोघांचीही व्हॉट्सॲप चॅटिंग पाहून चाहत्यांना अशी नेमकी काय व्हिडीओ आहे, असा प्रश्न पडला आहे. नेमकं त्या व्हिडीओमध्ये काय आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. एक्सवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करत या व्हिडीओबाबत विचारणा केली आहे. “बॉबी भाऊ तुम्ही तर हॅकर निघालात...” अशी एका युजरने कमेंट केली. “बॉबी सर कृपया करून तो व्हिडीओ लीक करा.” अशी कमेंट एका युजरने केली. (Social Media)

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचीही एक जाहिरात येणार आहे. त्या जाहिरातीबद्दल त्यांची दोघांचे हे संभाषण आहे. नेमकी ही कोणती प्रमोशनल स्ट्रेटेजी आहे का? असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. बॉबी देओलच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘ॲनिमल’नंतर अभिनेता बॉबी देओल ‘कंगुवा’ या तामिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला होता. तसेच बॉबी देओल ‘हरी हरा वीरा मल्लू’ या तेलुगू चित्रपटातून झळकणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

ICC Rankings: ICC टेस्ट रँकिंगमध्येही सिराज-जडेजाचा कहर; नंबर 1 ताजही बुमराहकडे कायम, 'या' फलंदाजाचं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT