भारताचा माजी खेळाडू एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला ५ वेळेस चॅम्पियन बनवलं आहे. कर्णधार म्हणून तर धोनी हिट आहे. यासह फलंदाज म्हणूनही तो सुपरहिट ठरला आहे. धोनी आयपीएल स्पर्धेत १५० हून अधिक वेळेस फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यादरम्यान त्याच्या नावे अशा एका रेकॉर्डची नोंद आहे, ज्या रेकॉर्डमध्ये तो विराट कोहली आणि रोहित शर्मापासून खुप दूर आहे.
हा रेकॉर्ड आहे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याचा. या बाबतीत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे धोनीपासून खुप पुढे आहेत. रोहित आतापर्यंत २३८ वेळेस फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यादरम्यान तो १६ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. तर विराट कोहली २२९ डावांत १० वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. यादरमन्यान रोहित शर्मा २८ वेळेस नाबाद परतला आहे. तर विराट कोहली ३४ वेळेस नाबाद परतला आहे. (Cricket news in marathi)
तर एमएस धोनीबद्दल बोलायचं झालं तर, २५० सामन्यांमध्ये तो २१८ वेळेस फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यादरम्यान त्याने ३८.७९ च्या सरासरीने ५०८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २४ अर्धशतकं देखील झळकावली आहेत. फिनिशर म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी एकूण ८७ वेळेस नाबाद परतला आहे.
तर बाद होण्याच्या बाबतीत तो केवळ ५ वेळेस शून्यावर बाद झाला आहे. या यादीत मुंबई इंडियन्स संघातील माजी फलंदाज कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानी आहे. पोलार्ड १७१ डावांमध्ये ५ वेळेस शून्यावर बाद झाला आहे. तर रॉबिन उथप्पा आणि सुरेश रैना प्रत्येकी ८-८ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.