भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुर असला तरी धोनी नेहमीच सोशल मीडियावर ट्रेडिंगला असतो. सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रिटायरमेंटनंतर काय करणार याबाबत भाष्य करताना दिसून येत आहे.
क्रिकेट सोडल्यानंतर धोनी काय करणार?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक क्रिकेट फॅन धोनीला विचारतो की, क्रिकेटनंतर काय करणार?' या प्रश्नाचं उत्तर देत धोनी म्हणाला की,'मी याबाबत काहीच विचार केलेला नाही. मी अजुनही क्रिकेट खेळतोय.
सध्या मी आयपीएल खेळतोय. मी क्रिकेटनंतर काय करावं याचा विचार करावा लागेल. एक गोष्ट आहे जी मला करायची आहे, ती म्हणजे आर्मीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं. कारण गेली काही वर्ष मी हे करु शकलेलो नाही.'
अनेकांना माहित नसावं, एमएम धोनी प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. त्याने २०११ मध्ये पॅराशूट रेजिमेंटसोबत ट्रेनिंगही केली होती. तो क्रिकेट खेळत असला तरीदेखील तो अजूनही वेळ मिळेल तेव्हा भारतीय सैनिकांना भेट देण्यासाठी जात असतो. (Latest sports updates)
आगामी हंगामात करणार चेन्नईचं प्रतिनिधित्व...
येत्या आयपीएल २०२४ स्पर्धेत एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. गेल्या हंगामात असं म्हटलं गेलं होतं की,आयपीएल २०२३ स्पर्धा ही धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल.
मात्र फायनल होताच धोनीने आगामी हंगामातही खेळणार असल्याची घोषणा केली होती. ४२ वर्षीय धोनीने चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.