

अंबरनाथच्या सर्वोदय नगर डम्पिंग ग्राउंडला लागली आग
रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पसरला धूर
डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिक हैराण
पुण्यात रंगलेल्या महाराष्ट्र केसरी मैदानातील माती विभागात महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेने पहिली फेरी जिंकून दिवस गाजविला. महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा अनुभवी महेंद्र गायकवाडने उत्कंठावर्धक लढतीत विशाल बनकरला 6-1 गुणांनी नमवून विजयी सलामी दिली. कोल्हापूरच्या बलाढ्य माऊली जमदाडेवर नाशिकच्या बाळू बोडकेने 10 -5 गुणानी सनसनाटी विजय नोंदविला.
जोतिष, तंत्र मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्यात. या दरम्यान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र रूपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे. नाशिक प्रकरणात रूपाली चाकणकरांची चूक नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.
'रूपाली चाकणकर यांचा काही दोष नाही, रूपाली चाकणकर या काही स्वतःहून गेलेल्या नाहीत कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील महाराजाचं दर्शन झालं असेल किंवा त्या भेटल्या असतील आपण कोणाला तरी गुरू मानतो, यात रूपाली चाकणकर यांची कुठलीही चूक नाही. मला जर कोण कुठे चल म्हटलं तर आणि मी गेलो आणि पुढच्याने माझा फोटो काढला त्यावरून काय झालं तर यात काय माझी चूक ? असा प्रति प्रश्न भरणे यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र येथे केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी निर्यातदार आणि आयातदारांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून घेतल्याचे सांगितले. देशाच्या १.४ अब्ज लोकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सरकार सज्ज असून देशसेवेसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रायगड जिल्ह्यातील जी. एम. वेदक कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत एका नव्या सामाजिक चळवळीचा पाया रचला आहे. 'मराठी एकता संघ रायगड' या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी ही संघटना कार्य करणार आहे.
या संघटनेची स्थापना प्रामुख्याने जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्यासाठी करण्यात आली आहे. जी. एम. वेदक महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अभ्यासानंतर आता सामाजिक ऋणातून ही संघटना उभी केली आहे. केवळ राजकीय हेतू न ठेवता, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या नवीन संघटनेच्या स्थापनेमुळे रायगड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून, सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जळगाव दौऱ्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडत निर्यातीसाठी सोयीसुविधा वाढवण्याची गरज व्यक्त केली. बनाना क्लस्टरच्या अटी सुलभ करण्यासोबतच रेल्वे सबसिडी पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. कापूस उत्पादकांच्या अडचणीही कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. नाशिकमधील घटनेवर बोलताना त्यांनी महिलांना भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आणि वेळेवर कारवाई झाल्याचेही नमूद केले.
सातपुडा परिसरात अवकाळी पावसाचा भीषण तडाखा....
मुसळधार पावसासह तुफान गारपीट.....
धडगाव तालुक्यातील भमाना परिसरात गारांचा खच.... जमिनीवर पांढरी चादर पसरली....
कडाक्याच्या उन्हात अचानक पारा घसरला....
अवकाळीचा सर्वाधिक फटका सातपुड्यातील कैरी आंबा पिकांना हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती....
पडलेल्या गारा वेचण्यासाठी लहान मुलांची एकच धावपळ उडाली, मात्र शेतकरी हवालदिल.....
सततच्या हवामान बदलामुळे सातपुड्यातील आदिवासी बांधव आणि बागायतदार अडचणीत
सांगली जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा कायम आहे.. सलग दुसऱ्या दिवशी मिरज तालुकयाला गारपीटीने झोडपून काढले आहे.सलगरे सह आसपासच्या परिसरामध्ये गारांचा तुफान पाऊस झाला आहे.. त्यामुळे रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडलं आहे.. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीचा फटका, सलगरे सह आसपासच्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे.. या परिसरातील द्राक्ष बागांचे मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
जालना जिल्ह्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
अनेक भागात गारांचा पाऊस
काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभऱ्याचे नुकसान
जालना जिल्ह्यातील कांदा उत्पादकासह फळ बागायतदारांची चिंता वाढली
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी चौकात कारला भीषण आग
या आगीत कार जळून खाक
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले
कोणतीही जीवितहानी नाही
वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रिसोड तालुक्यातील मोप परिसरात गारपीट झाली. बदलत्या हवामानामुळे काढणीला आलेली हळद, कांदा आणि आंबा फळबागांना नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली. फळ बागांना मोठा फटका बसला. अकोट तालुक्यातील सावरा, मोहाळा, वडनेर गंगईसह 15 ते 20 गावांत गारिपीटसह पाऊस पडला.
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारा व अवकाळी पावसाची हजेरी
सकाळपासून कडक ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण होते
निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडेमध्ये अवकाळी पावसासह गारपीट
गारपिटीमुळे द्राक्ष बागांना फटका, देवगाव मानोरीसह अन्य गावांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडला
बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली
हिंगोलीच्या जोडतळा सिरसम सावरगाव परिसरात पुन्हा गारांचा पाऊस पडला.
ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची धावपळ
शेतातील उत्पादित माल झाकण्यासाठी धडपड
पालघर : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या वरई गावाजवळील वांद्री नदी पुलावर भीषण अपघात
भरधाव दुचाकी थेट नदीत कोसळली
बाइकस्वार गंभीर जखमी
पुढील ३ तासांत अनेक भागांत गडगडाटासह पाऊस, गारपीटीचीही शक्यता
ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये तसेच दक्षिण-पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र-कच्छ, अंतर्गत महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश आणि पूर्व मेघालयात मध्यम ते तीव्र मेघगर्जनेसह पाऊस
विजांचा कडकडाट, 40 ते 60 किमी/ताशी वेगाने वारे
काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता,
नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन
राज्यांनी घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी पीएनजी कनेक्शन तातडीने द्यावेत, अशा सूचना केंद्र सरकारने दिली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिली.
हिंगोलीत पुस्तकांची गुढी उभारत अनोखा संदेश देण्यात आला आहे हिंगोली शहरातील श्रीकृष्ण भागातील रहिवाशी असलेल्या संतोष धारे यांनी ही अनोखी गुढी उभारली आहे आधुनिक काळात विद्यार्थ्यांसह तरुणांना पुस्तकि ज्ञानापेक्षा मोबाईल ज्ञान उत्साहित करत असल्याने मानवाच्या जीवनात वाचन संस्कृती महत्त्वाची असल्याने त्यांनी अभ्यासाकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.
पाडव्याच्या आदल्याच दिवशी एका मराठी तरुणीने दिला एका परप्रांतीयाला चांगलाच चोप
पवई मध्ये एका तरुणाला मुली कडून चोप
अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवून देत होता त्रास
घडलेला सर्व प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांना सांगितला
कुटुंबीयांनी तात्काळपणे त्या तरुणाला गाठून त्याला दिला चोप
मुंबईचे महापौर आणि उपमहापौर हे शहराचे प्रथम आणि द्वितीय नागरिक असल्यामुळे त्यांच्या पदाचा सन्मान राखणे प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मत उपमहापौर संजय घाडी यांनी व्यक्त केले. अधिकाऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये प्रोटोकॉलचे पालन करून महापौर आणि उपमहापौरांना योग्य तो सन्मान द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या 'तृतीयपंथी व्यक्ती सुधारणा विधेयक, २०२६' विरोधात पुण्यातील तृतीयपंथी समुदाय आणि LGBTQ+ संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "हे विधेयक आमचे घटनात्मक अधिकार हिरावून घेणारे आहे," असा आरोप करत पुण्यातील विविध संस्थांनी या कायद्याविरोधात 'रस्त्यावरची लढाई' लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सामाजिक मंत्री वीरेंद्र कुमार यांनी हा कायदा आणलेला आहे त्यांनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही. त्यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढला जाईल त्यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाईल, असा इशारा तृतीयपंथी यांनी दिला आहे.
धाराशिव जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले
धाराशिव, वाशी आणि कळंब या तालुक्यांमध्ये गारांसह पावसाची हजेरी
कांदा, आंबा, द्राक्ष, हरभरा, ज्वारी या पिकांनाही गारपीट आणि पावसाचा तडाखा
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून उपचारात कोणताही हलगर्जीपणा नाही, असं स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी गर्भपात प्रकरणावर दिलं आहे.
भिवंडी-ठाणे रस्त्यावरील कशेळी खाडीलगत फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग
फर्निचरची 15 दुकाने जळून खाक
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या उत्साहात डोंबिवली शहर आज रंगून गेले. श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा संयोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ साकारण्यात आले होते. मात्र यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचे दर्शन घडवणारा खास चित्ररथ नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून कल्याण लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे प्रतिबिंब या चित्ररथातून अत्यंत देखण्या पद्धतीने साकारण्यात आले होते.
19 मार्च 1986 रोजी राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून शासन दरबारी नोंद असून शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी मुलाबाळासह आत्महत्या केली होती .. तेव्हापासून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकरी आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात .. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी साहेबराव पाटील यांना अभिवादन करून आजच्या दिवशी एक दिवस अन्नत्याग आंदोलन करत आहेत
लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने, भाजीपाला शेतीला देखील मोठा फटका बसलाय, लातूरच्या चाकूर तालुक्यातील वडवळ परिसरात टोमॅटोची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र काल झालेल्या वादळीभरा आणि गारपिटीने टोमॅटो शेतीचे मोठे नुकसान झालं आहे, गारपीटीचा मार लागल्याने टोमॅटो आता नासाडी व्हायला सुरुवात झाली, तर बाजारात भाव पडल्याने देखील शेतकरी संकटात सापडले आहेत
मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या आजच्या दिवशी केल्या जाणाऱ्या वाहन खरेदीमध्ये यंदा किंचित घट नोंदवली गेली आहे
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा पुण्यात 12 हजार वाहनांची नोंदणी झाली आहे
गेल्या वर्षी पाडव्याला सर्वच वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ होती.
गेल्या वर्षी 13 हजार 190 वाहनांची खरेदी झाली होती.
यंदा गेल्या दहा दिवसांमध्ये 11 हजार एक 937 वाहनांची खरेदी झाली आहे. यामध्ये 7 हजार 986 दुचाकी 2 हजार 660 कारची खरेदी झाल्याचे चित्र आहे.
गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना भिवंडी शहरात टिळक चौक मित्र मंडळाच्या माध्यमातून शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.गणपती मंदिर,ब्राम्हण आळी,वाणीआळी,कासार आळी या मार्गी निघालेल्या या शोभायात्रेत शहरातील मान्यवर नागरिकांसह असंख्य नागरीक आबालवृद्ध महिला तरुण तरुणी मोठ्या जल्लोशपूर्ण वातावरणात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महिलांनी पारंपरिक खेळ ढोलताशा लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर करीत उत्साह वाढविला होता.
नांदेडच्या माहूर तालुक्यातील गोंडेगाव शिवारात एक बिबट्याचा पिल्ला विहिरीत पडला. रात्री हा बीबट विहिरीत पडला. सकाळीं शेतात कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना ही बाबा लक्षात आली. तात्काळ ही माहिती वन विभागाला देण्यात आली.वन विभाग, पोलीस प्रशासनाने रेस्क्यु करत या बिबट्याच्या पिल्लाला सुखरूप विहिरीतून काढले.अडीच ते तीन महिन्याचा हा बिबट असल्याचे सांगण्यात आले.अजुन तो शिकार करू शकत नाही.मादी बिबट्यासह तो या शिवारात आला असावा. अंधारात अंदाज न आल्याने हा बिबट विहिरीत पडला असावा असा अंदाज वन विभागाने वर्तवला. दरम्यान याच परिसरात त्याची आई असण्याची शक्यता आहे .. त्यामुळे जवळच्या जंगलात त्याला सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी साजरा केला गुढी पाडवा
सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबतचे फोटो केले सोशल मीडियावर शेअर
"मिस यू अजित काका" युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या आठवणीत केली पोस्ट
हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याण शहरात यंदा भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. कल्याण सांस्कृतिक मंच आणि जैन समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आयोजित या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सकाळपासूनच शहरातील विविध भागांतून नागरिक मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी एकत्र येऊ लागले होते. मराठी नववर्षाचा पारंपरिक उत्साह यावेळी ठळकपणे दिसून आला. मराठी तरुणांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान करून पारंपरिक वेशात सहभाग घेतला, तर महिलांनीही फेटे बांधून बाईक रॅलीत सहभागी होत हातात गुढी घेऊन नववर्षाचे स्वागत केले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबई शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेले अशाच प्रकारे गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं
गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलेने विशेष कपडे परिधान करण्यात आलेले आहेत त्यामुळे जोश उत्साह महिलांकडे पाहायला मिळतोय , तसेच महिलेने बाईकवर रॅलीचे आयोजन करण्यात आला असल्यामुळे त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे
आज सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचा उत्साहाचा माहोल पहायला मिळत आहे. या निमित्ताने रायगडमध्ये ठिकठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आल आहे. रायगडच्या महाड शहरात सकाळी महिला तरुण तरुणांनी पारंपारिक वेशभूषात शोभा यात्रा काढली. ढोल ताशा आणि खालूच्या गजरात लेझिम नाचत, मर्दानी खेळाची प्रात्याक्षिक या रॅलीदरम्यान दाखवण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे आज सकाळी अवकाळी पावसासह झालेल्या विजांच्या कडकडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान आरेगाव रोडवरील वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा मंदिरावर अचानक वीज कोसळल्याची घटना घडली. या घटनेत मंदिराच्या काही भागाचे नुकसान झाले असून, त्या वेळी मंदिरात पूजा करत असलेल्या महिलेचा सुदैवाने थोडक्यात बचाव झाला. मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. वीज कोसळल्यामुळे मंदिराच्या रचनेला काही प्रमाणात हानी पोहोचली असून, स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वादळी पावसाच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर पोलो कारला भिषण अपघात
अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू
खालापुर ते पनवेल दरम्यान मुंबई लेनवर झाला अपघात
अतीवेगात ओव्हर टेक करीत असताना कार पलटली आणि अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती
आज राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर येथील घरी गुढी उभारून त्याची पूजा केली गिरीश महाजन व साधना महाजन यांनी गुढीला पूजन करून आपल्या दारी गुढी उभारली गुडी पाडव्याचे महत्त्व कलश चे महत्व म्हणजे यश श्री , कडू लिंबाचे महत्व म्हणजे आरोग्य , पुष्पहार म्हणजे मांगल्य , साखर गाठी म्हणजेच माधुर्य , जरीची साडी चे महत्व म्हणजेच वैभव , आणि काठी म्हणत म्हणजेच सामर्थ्य हे सर्व मिळून बनते गुढी मराठी नवीन वर्षाची सुरुवात, अशाच नववर्षाची सुरवात केली
कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना
तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी
खरात सध्या नाशिक गुन्हे शाखेच्या अटकेत
न्यायालयाने खरातला सुनावलीय २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
गुढी पाडव्यानिमित्त पुण्यात शोभायात्रेचे आयोजन
पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रेला सुरुवात
पारंपरिक वाद्य आणि ढोल ताश्याच्या निनादात शुभा यात्रेला सुरुवात
पारंपरिक पोशाख परिधान करून लहानांपासून ज्येष्ठ नागरिक शोभायात्रेत सहभागी
चिमुकल्यांकडून मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके
चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा या सणाला विशेष महत्व आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने व्हावी म्हणून आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून च मोठी गर्दी केलीय. बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. संस्कृतीक शहर पुण्यामधील आजचे वातावरण अगदी मंत्रमुग्ध करणारे आहे. सकाळपासूनच लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
लातूरमध्ये वादळीवारा आणि अवकाळी पावसाचा जोरदार पट्टा फळबागेला बसताना पाहायला मिळतोय , प्रामुख्याने काढणीला आलेले शेतीपिक , आणि फळबागांना सर्वाधिक फटका आहे, जिल्हाभरात चार जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे,
वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथील मंदिराला सिलेंडर टंचाईचा फटका बसला आहे. व्यवसायिक सिलेंडर मिळत नसल्याने भक्तासाठी बनवण्यात येणारा महाप्रसाद हा चुलीवर बनवण्याची वेळ मंदिर प्रशासनावर आली आहे.येथे विदर्भातून नव्हे तर महाराष्ट्रच्या वेगवेगळ्या भागातून भाविक येतात. येथील प्रसाद हा प्रसिद्ध आहे आता सिलेंडर टंचाईमुळे भाविकांच्या प्रसादाची सोय चुलीवर प्रसाद बनवून करावी लागत आहे.लवकरात लवकर सिलेंडरची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्याची परंपरा जपत राज्यभरातून हजारो भाविक शेगावात दाखल झाले आहेत... श्री संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी कुटुंबासह उपस्थित राहून नववर्षाची सुरुवात भक्तीमय वातावरणात केली. शेगाव शहर पूर्णतः भाविकांनी फुलून गेले असून मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस प्रशासन आणि मंदिर समितीकडून भाविकांच्या सोयीसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेगावात भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचे सुंदर दर्शन घडत असून नववर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात होत आहे.
साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून येतोय.. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आलीये.. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत असून साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीये.. आज साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आलीये.. तर साई मंदिर आकर्षक फुलांनी सजल आहे.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी...
महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात म्हटले आहे की,' नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा- आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा... मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !'
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता स्थानिक लघु उद्योगांवरही दिसून येत आहे. लोणावळ्यातील जग प्रसिद्ध चिक्की उद्योगाला कमर्शियल गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक कारखान्यांमधील उत्पादन पूर्णपणे बंद झाले आहे. दोन दिवस पुरेल एवढीच तयार चिक्की त्यांच्याकडे आहे. मात्र दोन दिवसानंतर दुकानच बंद करण्याची वेळ चक्की व्यवसायिकावर आलेली आहे.
पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात राज्यासह देश-विदेशातील पर्यटक चिक्की खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. मात्र, व्यवसाईक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला बसत आहे. लोणावळ्यातील अनेक चिक्की कारखाने बंद झाल्या मुळे कामगार बेरोजगार झाले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम त्यांचा मतदारसंघात असलेल्या शोभा यात्रेत आठ रस्ता चौकातून सहभागी
हिंदू नववर्षाचा स्वगतानिमित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यात आवर्जुन हजेरी लावत असतात....
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या बेकायदेशीर वापरावर प्रशासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नीता लबडे यांच्या पुरवठा विभागाने शहरातील हॉटेल आणि ढाब्यांवर अचानक छापे टाकले.
या कारवाईदरम्यान १९ हॉटेलची तपासणी करण्यात आली असून १२ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. हॉटेल गोपाळ, मनुमाता भरीत सेंटर, सुहास हॉटेल, युवा प्रतिष्ठान आणि तवक्कल हॉटेल यांसारख्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे हा गुन्हा असल्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, पुढील काळातही अशा मोहिमा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मालमतांची झाडाझडती सुरू
मागील काही वर्षात खरातने गोळा केली कोट्यावधींची माया
नाशिक शहरातील आलिशान बंगला, ऑफिससह पाथर्डी परिसरात कोट्यावधींची ३० एकर जमीन
तर सिन्नरसह ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीत देखील कोट्यावधींची जमीन
अशोक खरातने मागील काही वर्षात जवळपास २०० कोटींची माया जमवल्याची चर्चा
नाशिक पोलिसांकडून सिन्नरमधील मिरगाव येथील फार्म हाऊसची रात्री तपासणी
याशिवाय मिरगावतील इशान्येश्वर मंदिर आणि कुटीयाची केली तपासणी
मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेत्यांसह कलाकार मंडळींचा असायचा राबता
महिलेच्या लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरात आहे अटकेत
सोलापूर शहर अन्न पुरवठा विभागाच्या पथकाकडून शहरात धाडसत्र सुरु
शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केल्याने कारवाई
पावभाजी, चायनीज सेंटरवरुन तब्बल 41 टाक्या ताब्यात घेतल्या
शहर अन्न धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांची माहिती.
पार्क चौक, जुळे सोलापूर, विजयपूर रोड, कंबर तलाव या भागातील चायनीज आणि पावभाजी सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या.
विजापूर नाका, सदर बाजार आणि जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु
मध्यपूर्व आशिया अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खरेदीचा उपाय म्हणून घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरकांची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बैठक घेऊन आढावा घेतला जिल्ह्यामध्ये सिलेंडरचा पुरेसासाठा उपलब्ध असून नागरिकांना बुकिंग नंतर फास्ट इन फास्ट ऑर्डर नुसार सिलेंडर उपलब्ध होईल तसेच गॅस एजन्सीवर गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टम लागू करावी बुकिंग नंतर आठ दिवसाच्या आत ग्राहकाला सिलेंडर उपलब्ध होईल असे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यंत्रणेला दिल्या आहे.
,लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लातूरच्या गोंदेगाव शिवारात, अवैद्य गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, दरम्यान माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकत , तब्बल 34 किलो गांजाच्या मुद्देमालासह, आरोपीला ताब्यात घेत कारवाई केली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आलाय.साडेतीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालुन अलंकार पुजा करण्यात आली.देवीची पहाटे 5 वाजता आरती करुन तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधीवत पुजा करुन गुढी उभारण्यात आली.तुळजापूर मंदीरावर गूढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात नागरीक घरोघरी गुढी उभी करतात.दरम्यान तुळजाभवानी मंदीराचा विकास आराखडा जो सुरू होणार आहे तो निर्विघ्न पार पडावा अशी प्रार्थना गुढी समोर महंतानी केली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.