Chetan Bodke
'ॲनिमल' मधील बॉबी देओलपासून 'जवान'मधील विजय सेतुपथीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
२०२३ हे वर्ष अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खास ठरलं. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
चला तर जाणून घेऊया, कोणकोणत्या कलाकारांनी खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
'जवान' या ॲक्शनपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता विजय सेतुपथीने साकारली होती. बॉलिवूड डेब्यू चित्रपट असून प्रेक्षकांना विजय सेतुपथीची भूमिका पसंदीस पडली.
बॉबी देओलने 'ॲनिमल' चित्रपटात खलनायकाचे पात्र साकारले. त्याने चित्रपटामध्ये मूक खलनायकाचे पात्र साकारले असून त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बॉलिवूडचा हँडसम अभिनेता अर्जुन रामपालने 'भगवंत केसरी'मध्ये खलनायकाचे पात्र साकारले.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'पठान' चित्रपटामध्ये जॉन अब्राहमने खलनायकाचे पात्र साकारले. चित्रपटातल्या सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक कायम होते.
सलमान खान स्टारर 'टायगर ३' चित्रपटात इमरान हाश्मीने खलनायक आणि माजी आयएसआय एजंट आतिश रहमानची भूमिका साकारली.
सनी देओल-अमिषा पटेल स्टारर 'गदर २' चित्रपटामध्ये मनीष वाधवाने पाकिस्तानी सैन्याच्या मेजर जनरलचे पात्र साकारले होते. यामध्ये त्याची एका खलनायकासारखीच भूमिका होती.