जगभरात कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमुळे आपण सर्वांशी कनेक्ट होऊ शकतो. व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फिचर लाँच करत असतो. आता व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर लवकरच लाँच होणार आहे.
व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर युजर्संच्या वापरासाठी सोपे आहे. व्हॉट्सअॅप ५ नवीन फिचर लाँच करणार आहेत. त्यामुळे युजर्संना फायदा होणार आहे. WAbetainfo या वेबसाइटने यासंदर्भात माहिती दिली आहे.
1. एका फोनवर दोन व्हॉट्सअॅप
जर तुमच्या फोनमध्ये ड्युअल सिम असेल तर तुम्हाला एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. याआधी दोन व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी क्लोन अॅपचा वापर करावा लागत असे. तर आता कंपनी लवकरच नवीन फिचर लाँच करणार आहे. यामध्ये तुम्ही दोन नंबरवरुन व्हॉट्सअॅप वापरु शकणार आहेत.
2. ई-मेल व्हेरिफिकेशन
व्हॉट्सअॅअप लवकरच नवीन ई-मेल व्हेरिफिकेशन फिचर लाँच करणार आहे. हे फिचर व्हॉट्सअॅपच्या अकाउंट सेटिंग्समध्ये ई मेल अॅड्रेसमध्ये दिसू शकते. हे फिचर कधी लाँच होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
3. सर्च कॅलेंडर
व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फिचर लाँच करणार आहे. हे फिचर युजर्संना सर्चमध्ये कॅलेंडर रुपात दिसेल. याच्या मदतीने युजर्स जुन्या फाईल्स सहज शोधू शकतात. यामध्ये तुम्ही तारीख सर्च करुन मेसेज शोधू शकतात.
4. Alternate Profile Privacy Feature
व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच प्रायव्हसीसाठी नवीन फिचर येणार आहे. Alternate Profile Privacy Feature हे नवीन फिचरचे नाव आहे. यामध्ये तुमचा नंबर ज्या लोकांकडे सेव्ह नाहीये. त्या लोकांसोबत तुम्ही अल्टरनेट प्रोफाइल शेअर करु शकता. अल्टरनेट प्रोफाईलमध्ये तुमचे नाव, फोटो आणि माहिती चेंज केली जाऊ शकते.
5. ओरिजनल क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता
व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरमध्ये तुम्ही ओरिजनल क्वालिटीमध्ये फोटो शेअर करु शकतात. जसे फोटो तुम्ही फोनमध्ये काढणार त्याच क्वालिटीमध्ये तुम्ही फोटो शेअर करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.