दिवाळी म्हटलं की, दिव्यांची आरास, रांगोळीचे रंग, फटाके, फराळाची चव चाखयला मिळते. सध्या दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. तसेच वर्षातला हा सगळ्यात मोठा सण मानला जातो.
हिंदू धर्मात दिवाळीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून दिवाळीला सुरुवात होते. या सणामध्ये दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तांनंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवाळी (Diwali) पाडवा. यंदा हा सण १४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून व्यापारी वर्षास सुरुवात होते. तसेच या दिवशी पती पत्नीला ओवाळण्याची परंपरा आहे. या दिवशी पती पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा तिच्या आवडीची भेटवस्तू देतो. हा सण पती पत्नीच्या नात्यातील (Relation) गोडवा जपणारा सण म्हणूनही ओळखला जातो. याच सणानिमित्त (Festival) तुमच्या प्रियजनांना पाठवा शुभेच्छा
1. दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
2. आला पाडवा,
चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
3. धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!
4. उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
5. सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.