बालदिन म्हटंल की, आपल्याला पुन्हा लहान व्हावेसे वाटते. लहानपणीच्या गोड आठवणी डोळ्यांसमोर तरंगळू लागतात. या दिवशी प्रत्येकाला आपल्याला लहानपणाच्या अल्लड गोष्टींवर हसू येते. अनेक किस्से आठवत, मित्रांसोबत केलेली मस्ती आणि भविष्याची रंगवलेली स्वप्नांची चर्चा या आणि अशा अनेक आठवणी जागा होतात.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहानपण जगण्यासाठी कोणत्याही दिवसाची गरज नसते. रोज कुठला ना कुठला दिवस हा खास असतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुले (Kids) ही देवाघराची फुले असे म्हटले जाते. निरागस लहान मुले जेव्हा घरात असतात तेव्हा संपूर्ण जग विसरुन त्यांच्यात रममाण होण्यात वेगळाच आनंद असतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. चिमुकल्यांच्या लाडक्या चाचा नेहरुंना आदरांजली म्हणून त्याच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात (India) बाल दिन साजरा (Celebrate) केला जातो. या निमित्ताने तुमच्या लाडक्या चिमुकल्यांसाठी खास शुभेच्छा
1. लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड.
2. मुलंही ओल्या मातीसारखी असतात, त्यांना तुम्ही जसा आकार द्याल तशी ती घडतात.
3. कालपण, आजपण आणि उद्यापण...
जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते
बालपण !!!
बालदिनाच्या सर्व बालमित्रांना शुभेच्छा...
4. मनात बालपण
जपणाऱ्या प्रत्येकास
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5. लहानपणी सगळे विचारायचे
की मोठेपणी काय व्हायचय?
पण आता विचारलं तर...
पुन्हा एकदा लहान व्हायचय
बालदिनाच्या सर्व बालमित्रांना शुभेच्छा...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.