Child Care Tips : मुलांच्या वयानुसार उंची वाढत नाहीये? आहारात आजच करा या पदार्थांचा समावेश

Child Growth And Development : पालकांनी लहानपणापासूनच मुलांना हेल्दी पदार्थ खायला दिले तर त्यांचे आरोग्य आणि उंची दोन्ही चांगले राहाण्यास मदत होते.
Child Care Tips
Child Care Tips Saam Tv
Published On

Child Growth Issue :

वाढत्या वयात मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी पालक अनेक प्रकाराचा प्रयत्न करत असतात. अशातच सुंदर आणि आकर्षण दिसण्यासाठी उंची ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. कमी उंचीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

पालकांनी लहानपणापासूनच मुलांना हेल्दी पदार्थ खायला दिले तर त्यांचे आरोग्य आणि उंची दोन्ही चांगले राहाण्यास मदत होते. काही वेळेस आनुवांशिकतेमुळे देखील मुलांची उंची वाढत नाही. जर तुम्हाला देखील मुलांच्या उंची बाबात काळजी वाटत असेल तर आहारात या पदार्थाचे सेवन करु शकता. ज्यामुळे मुलांची उंची वाढू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. दुग्धजन्य पदार्थ

मुलांची (Child) उंची वाढवण्यासाठी पालकांनी त्यांना दुग्धजन्य पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ घालावे. त्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई पुरेशा प्रमाणात असते. त्यामध्ये प्रथिनेसोबत कॅल्शियम देखील आढळते. ज्यामुळे मुलांच्या वाढीस मदत होते.

Child Care Tips
Air Pollution Affects Eye : वाढत्या प्रदूषणामुळे डोळे लाल होणे, सतत खाज सुटते; कशी घ्याल डोळ्यांची काळजी?

2. अंडी

अंडी (Eggs) हा प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन (Vitamins) बी२ आढळते. जे मुलांची उंची वाढवण्यास मदत करतात. जर तुम्हालाही मुलांची उंची वाढवायची असेल तर आहारात अंड्यांचा समावेश करा.

3. सोयाबीन

शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. यामध्ये असलेले पोषक तत्व हाडे मजबूत करतात. ज्यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते. त्यासाठी मुलांच्या आहारात सोयाबीनचा समावेश करा.

Child Care Tips
Diwali Health Tips: फेस्टिव्हल सीझनमध्ये फिट राहायचे आहे? या गोष्टींची काळजी घ्या

4. केळी

अनेक पौष्टिक गुणांनी भरलेली केळी मुलांची उंची वाढवण्यास उपयुक्त ठरु शकते. हे फळ कॅल्शियम, पोटॅशियम, मँगनीज, फायबर यासारखे अनेक आवश्यक घटक यात आहेत.

5. हिरव्या पालेभाज्या

मुलांच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका असणारे हिरव्या पालेभाज्या. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक त्यात आढळतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com