Diwali Health Tips: फेस्टिव्हल सीझनमध्ये फिट राहायचे आहे? या गोष्टींची काळजी घ्या

Health Tips : दिवाळीच्या काळात आपण अधिक तेलाचे आणि गोडाचे पदार्थ खाल्यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि उलट्या यासांरख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Diwali Health Tips
Diwali Health TipsSaam Tv
Published On

Healthy During Festive Season :

दिवाळी हा आनंद, उत्साहाचा आणि नवचैतन्याचा सण. या दिवासात गोडाच्या पदार्थासोबत तळलेले, गोडाचे आणि मसालेदार पदार्थ चवीचवीने खाल्ले जातात. परंतु, हेच पदार्थनंतर आपल्या आरोग्याला अधिक समस्या देखील पोहोचते.

दिवाळीच्या काळात आपण अधिक तेलाचे आणि गोडाचे पदार्थ खाल्यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि उलट्या यासांरख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तळलेले पदार्थ वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढवतात. सणाचा आनंद लुटताना खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याला काही प्रमाणात काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी ते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. आहार

सणात (Festival) हेल्दी राहायचे असेल तर यासाठी आपण काय खातो आणि पितो यावर लक्ष द्या. आपण खात असलेले अन्नपदार्थाचे तीन ते चार भाग करा. नाश्त्यात गोड आणि तळलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. सकाळच्या नाश्त्यामध्ये (Breakfast) पोषक तत्वांचा समावेश करा. फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा देखील समावेश तुम्ही करु शकता.

Diwali Health Tips
Diabetes Health : मधुमेहींनो, दिवाळीत गोड पदार्थ खाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच; शुगर राहिल नियंत्रणात

2. हायड्रेट राहा

हिवाळा सुरु झाला की, आपण शक्यतो पाणी (Water) कमी पितो. त्यामुळे हायड्रेशनची समस्या जाणवू लागते. अशावेळी पाणी भरपूर प्या. यामुळे भूक नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

3. बाजरीचा समावेश

दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बाजरीचा समावेश करा. बाजरी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असते. याचे सेवन केल्याने गॅस, अॅसिडीटी, साखर, कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्या दूर राहतात. तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो.

Diwali Health Tips
Child Care Tips : पालकांनो, वाढत्या वयात मुलांची वाढ खुंटतेय? कशी घ्याल काळजी?

4. अॅक्टिव्ह राहा

सणासुदीच्या काळात थोडा वेळ व्यायाम करा. शारीरिक हालचाल केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जात्मक वाटेल. तसेच योगासने, चालल्याने कॅलरीज बर्न होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com