सणासुदीला सुरुवात झाली आहे. दिवाळी (Diwali) सोबतच या महिन्यात धनत्रयोदशी, भाऊबीज असे सण साजरे केले जाणार आहेत. अशा स्थितीत या सणासुदीत तुम्हाला सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळे दिसायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips) देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सणासुदीच्या काळात स्वतःला स्टाईल करू शकता. या टिप्स फॉलो केल्यास लोक तुमची स्टाइल आणि फॅशन सेन्स पाहून प्रभावित होतील.
साधेपणा -
सुंदर आणि मोहक दिसण्यासाठी साधेपणा खूप महत्त्वाचा आहे. अशा वेळी सणासुदीच्या काळात तुम्ही किमान एम्ब्रॉयडरी असलेली साडी किंवा ड्रेस निवडाने महत्त्वाचे ठरेल. तसेच कानातले आणि गळ्यात नाजूकशी चैन असे दागिने तुमचा साधेपणा दिसण्यास मदत होईल. किंवा तुम्हाला भारी दागिने आवडत असतील तर त्यासोबत हलकी साड़ी घाला आणि ड्रेस परिधान करा.
रंग -
बदलत्या काळानुसार पेस्टल कलर आता ट्रेंडमध्ये आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये हलके आणि पेस्टल रंग खूपच आलिशान दिसतात. तुम्ही कोणताही रंग निवडलात तरी तुम्हाला ते शोभून दिसेल. हे रंग सर्वसाधारण सगळ्याच टोनच्या व्यक्तिंवर शोभतात.
मिनिमल मेकअप लुक -
सध्या सिंपल सोबर असा ट्रेंड सुरू असल्याने महिला जास्त मेकअप न करता नो मेकअप लूक देऊन सुंदर दिसतात. सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला जास्त मेकअपची गरज नाही. कमी मेकअप करूनही तुम्ही सुंदर दिसू शकता.
फॅब्रिकची योग्य निवड -
उत्सवात सुंदर दिसण्यासाठी तुमच्या त्वचेशी सुसंगत होईल असे फॅब्रिक निवडणे महत्त्वाचे आहे. फॅब्रिक असे निवडा जो परिधान केल्याने तुम्हाला आरामदायी वाटेल. फॅब्रिकची देखभाल करणे देखील सोपे असावे याची जाणिव ठेवा.
मिक्स अँड मॅच -
आजकाल लोक मिक्स अँड मॅच करतात. त्यामुळे मॅचिंगच्या त्रासात पडण्याऐवजी तुम्ही मिक्स अँड मॅचही करू शकता. असे केल्याने तुमचा लुक आणखी चांगला दिसेल. प्लेन सूटसोबत जड दुपट्टा कॅरी करू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.