काही दिवसांतच दिवाळीला सुरुवात होणार आहे. या सणासुदीच्या काळातच कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र भेटतात आणि भरपूर मौज मजा करतात. अशा वेळी घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि मिठाईही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. सणासुदीला गोड आणि तेलकट पदार्थ खाण्यापासून माणूस स्वतःला रोखू शकत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सणासुदीच्या काळात वजन नियंत्रित करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
शारीरिक हालचाल
सणासुदीच्या काळात बरेच लोक व्यायाम आणि कसरत करण्यास जास्त महत्त्व देत नाही किंवा तेवढा पुरेसा वेळही मिळत नाही. परंतु तुम्ही त्यात अजिबात संकोच करू नका. तुम्हाला जीममध्ये जावेसे वाटत नसल्यास, तुम्ही कुटुंबासोबत कोणतेही मैदानी खेळ खेळू शकता. यामुळे तुम्ही अॅक्टिव्ह राहाल आणि कुटुंबासोबत एन्जॉयही करू शकाल. तसेच, नुसते बसण्याव्यतिरिक्त, आपण स्वयंपाकघरातील (Kitchen) कामात किंवा घरातील इतर कामात मदत केली पाहिजे. या छोट्याशा मदतीमुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज संतुलित राहतील.
पोर्शन कंट्रोल
सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि मिठाई खाण्यापासून स्वतःला रोखणे खूप कठीण आहे आणि तुम्ही स्वतःला थांबवू नका. पण विचारपूर्वक खाणे महत्त्वाचे आहे. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी कमी प्रमाणात खा. एकाच वेळी जास्त खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच गोड आणि तेलकट पदार्थ खाण्यासोबतच भाज्या, प्रथिने आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सर्व काही खाऊ शकता परंतु तुमच्या वजन वाढण्यावरही कंट्रोल करा आणि लक्षात ठेवा.
हायड्रेटेड रहा
दिवाळीत हिवाळ्याचे आगमन होते, ज्यामुळे हवामान थंड होऊ लागते. हिवाळ्यात तहान खूपच कमी लागते परंतू तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमची मिठाई खाण्याची लालसा कमी होईल. जेव्हा तुम्ही गोड खात नाही, तेव्हा तुमचे वजनही नियंत्रीत राहते.
शक्य तितके चालणे
सणासुदीमुळे व्यायाम करता येत नसेल तर शक्य तितके चालणे गरजेचे आहे. दर 2 तासांनी 15 मिनिटे चाला. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा आणि वस्तू खरेदी करण्यासाठी वाहनांनी न जाता पायी जा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.