वाढत्या वजनामुळे हल्ली सगळेच त्रस्त आहेत. कामाच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे सतत एकाच ठिकाणी बसल्यामुळे वजन वाढणे, पोट पुढे येण यासारख्या समस्या अनेकांना जाणवतात. कामामुळे जीमला जाणे किंवा व्यायाम करायला मिळत नाही.
बरेचदा पोटाभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. यामध्ये काहींचे हात पाय हे अगदी बारीक असतात. तर पोटाभोवतीचा भाग आणि मांड्यांच्या भागात अतिरिक्त प्रमाणात चरबी वाढते. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जंक फूड, प्रोसेस्ड फूड, गोड पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे चरबी जमा होते. सणासुदीच्या काळात आपल्या प्रत्येकाला स्लिम-फिट दिसायचे असते. अशावेळी काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया
पोटाची चरबी कमी करण्यासाठी डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करा
1. नट्स
नियमितपणे सुकामेवा खाल्ल्यास शरीराला पोषकतत्व मिळते. रात्रभर पाण्यात ड्रायफ्रूट्स भिजत ठेवा. सकाळी दिवसाची सुरुवात भिजवलेल्या सुकामेव्याने करा.
2. प्रोटीनयुक्त नाश्ता करा
सकाळचा नाश्ता हा सगळ्यात चांगला आहार मानला जातो. त्यासाठी नाश्त्यात (Breakfast) हेल्दी पदार्थांचा समावेश करा. डाळींचा डोसा किंवा ओट्ससारख्या पदार्थांचा समावेश करा.
3. तूप
दुपारच्या जेवणात तेलापेक्षा तूप अधिक चांगले समजले जाते. तुपामध्ये असणारे गुणधर्म हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
4. दही
दह्यामध्ये गुड बॅक्टेरियाचा चांगल्या प्रमाणात असतात. त्यासाठी नियमितपणे दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास फायदा होईल.
5. गोड पदार्थ खाणे टाळा
अनेकांना जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु, अशावेळी गोड पदार्थ खाणे टाळा, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्याऐवजी दालचिनी खा.
6. वेळेवर जेवा.
वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर जेवणे. कामाच्या गडबडीत बरेचदा आपण वेळेवर जेवण करत नाही. रात्री झोपण्याच्या किमान ३ तासाआधी जेवण करा. तसेच जेवल्यानंतर शतपावली देखील करा.
7. व्यायाम करणे गरजेचे
पुरेशा आहारासोबत व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी काही साधे सोपे व्यायाम करा किंवा योगासने करा. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.