Diwali 2023 Cleaning Tips : दिवाळी आली! लख्ख चमकवा तुमचे देवघर, फॉलो करा या टिप्स

Temple Cleaning Tips : दिवाळी जवळ आली आहे आणि अनेकांकडे साफसफाईचे काम जोरात सुरू केले आहे.
Diwali 2023 Cleaning Tips
Diwali 2023 Cleaning TipsSaam Tv
Published On

दिवाळीची साफसफाई

दिवाळी जवळ आली आहे आणि अनेकांकडे साफसफाईचे काम जोरात सुरू केले आहे. आणि अशातच घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच पूजाघर किंवा मंदिर. मंदिर साफ करणे कोणी कसे विसरेल का? वर्षभरात लोक नेहमी देवारा पहिला स्वच्छ करतात. परंतु, समस्या अशी आहे की या गोष्टी साफ करणे फारसे सोपे नाही.

कारण या सर्व गोष्टी वेगवेगळ्या धातूपासून बनवलेल्या असतात. त्यामुळे यावर केलेली मेहनतही वाया जाते, यावर सामन्य साफसफाईच्या पद्धतींनी साफ (Clean) करता येत नाहीत. याच कारणाने दिवाळीला (Diwali) तुमच्या मंदिरात शंख, देवाची मूर्ती आणि पूजेची भांडी अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करता येतील, जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरातील पूजेचे सामान कसे स्वच्छ करावे

शंख कसे स्वच्छ करावे

अनेकांच्या देवाऱ्यात शंख असतो. परंतु, ते साफ करणे सोपे नाही. अशा स्थितीत तुम्ही शेव्हिंग क्रीम आणि टूथपेस्टच्या मदतीने ते स्वच्छ करू शकता. यासाठी सर्वात आधी एका ताज्या भांड्यात शेव्हिंग क्रीम किंवा टूथपेस्टमध्ये एक ते दोन कप पाणी घालून मिश्रण तयार करा. आता या मिश्रणात शंख 15 मिनिटे ठेवा. यानंतर, मऊ ब्रश किंवा स्वच्छ कापडाच्या (Cloths) मदतीने ते साफ करा.

Diwali 2023 Cleaning Tips
Diwali Car Deals In November : दिवाळीचा धमाका! जबरदस्त मायलेज, दमदार रेंजसह या कारवर मिळतेय विशेष सूट; लिस्ट पाहा

पंचधातूची मूर्ती कशी स्वच्छ करावी

पंचधातूची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू, बेकिंग सोडा किंवा वाळू वापरू शकता. तुम्हाला फक्त लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळायचा आहे आणि त्या मिश्रणाने पंचधातूची मूर्ती स्वच्छ करावी. याशिवाय पंचधातूच्या मूर्तीला वाळूमध्ये लिंबाचा रस मिसळून घासून स्वच्छ करू शकता.

पितळेची मूर्ती कशी स्वच्छ करावी

पितळेची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ वापरू शकता. यासाठी लिंबाच्या तुकड्यावर मीठ लावून पितळेच्या मूर्तीवर डाग असलेल्या भागावर चोळा. यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. नंतर लिंबू एकदा पुन्हा चोळा म्हणजे तुमची मूर्ती चमकेल आणि साध्या कपड्याने पुसून काढा.

Diwali 2023 Cleaning Tips
Diwali Cleaning Tips : दिवाळीत खिडकीचे पडदे धुवायचा कंटाळा आलाय? या सोप्या टिप्स फॉलो करुन झटपट स्वच्छ करा

पितळेची भांडी कशी स्वच्छ करावी

पितळेची भांडी स्वच्छ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्वप्रथम गरम पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा. या पाण्यात सर्व भांडी बुडवून ठेवा. सुमारे 20 ते 25 मिनिटांनंतर स्क्रबरच्या मदतीने ही भांडी घासून घ्या. तुम्हाला आढळेल की ही भांडी जास्त मेहनत न करता सहज चमकतील. त्यामुळे अशा प्रकारे तुमच्या पूजा कक्षात ठेवलेली प्रत्येक वस्तू स्वच्छ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com