Home Tips : ट्रेंडनुसार सजवा तुमचे स्वयंपाकघर!

स्वयंपाक घर हे प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळाच्या प्रश्न असतो त्याला कशाप्रकारे सजवायचे यासाठी काही टिप्स
kitchen decoration tip
kitchen decoration tipब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : पूर्वीच्या काळी बहुतेक स्वयंपाकासाठी स्वतंत्र खोली होती परंतु, आजच्या युगात ट्रेंडनुसार (Trend) स्वयंपाकघर आणि जेवणाचे खोली एकत्र पाहायाला मिळते. सध्या स्वयंपाकघर हे ओपन किचन म्हणून पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहून घरातील इतर व्यक्तीशी बोलू शकतो. यासोबतच आपण स्वयंपाकघरात उभे राहून घराचा प्रत्येक कोपरा पाहता येतो जरी ही संकल्पना नवीन आणि आधुनिक असली तरी दिसण्यास छान आहे. हल्लीच्या ट्रेंडनुसार आपल्या घरात जुन्या पिढीतल्या गोष्टींना नवीन पद्धतीचे रूप मिळत आहे त्यातलं एक म्हणजे स्वयंपाकघर. नवीन पद्धतीनुसार आपण वेगवेगळ्या डिजाईनचे, मॉडेलनुसार किचनला आकार देण्याचा आपला प्रयत्न सुरु असतो.

हे देखील पहा -

या प्रकारे सजवा आपल्या ओपन किचनला

१. आपण आपल्या किचनला उजळ आणि ठळक गडद रंगाने रंगवू शकता. तसेच आजकाल फॅन्सी लाइट खूप ट्रेंडिंग आहेत. अशावेळी आपण स्वयंपाकघरात या फॅन्सी लाइटचा वापर करु शकतो त्यामुळे आपल्याला स्वयंपाकघरात रेस्टॉरंटचा अनुभव येईल.

२. इंटिरियर डिझायनर्सच्या मते, स्वयंपाकघरात जास्त प्रकाश नसायला हवा कारण, त्यामुळे आपली लिव्हिंग रूम (Room) कमी आकर्षक दिसेल.

kitchen decoration tip
Benefits of Sweet lemon: मोंसबीच्या सालींचा उपयोग असा ही !

३. आपण आपले स्वयंपाकघर अधिक अँक्सेसरीजने किंवा ठळक रंगाने रंगवले तर आपला हॉलरुम आपल्या स्वयंपाकघरासमोर फिकट होईल.

४. स्वयंपाकघराची सजावट करताना शक्य असल्यास स्वतंत्र कपाट बनवा ज्यामुळे ओपन किचनमध्ये भांडी आणि इतर वस्तूंनी भरणार नाही. त्यामुळे किचन मोकळे दिसेल.

५. किचनमध्ये आपण इंडोर प्लांट (Plant) लावू शकतो. त्यामुळे आपल्या घरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.

६. ओपन किचनमध्ये आपण काही अशा युनिक शोपीसच्या वस्तू ठेवू शकतो. ज्या किचनमधील इतर छोट्या वस्तूंना मॅनेज करतील. त्यामुळे वस्तू देखील राहतील आणि शोपीसही दिसेल.

अशाप्रकारे आपण आपले ओपन किचन सजवू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com