Weight Loss Tips : वजन झटपट कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ खाणे टाळा, जाणून घ्या

These Food Avoid In Breakfast : लठ्ठपणा ही आजकाल बहुतेक लोकांची समस्या झाली आहे.
Weight Loss Tips
Weight Loss Tips Saam Tv
Published On

Weight Loss :

लठ्ठपणा ही आजकाल बहुतेक लोकांची समस्या झाली आहे. वजन वाढण्याचे कारण म्हणजे शरीरात चरबी जमा होणे. अशा स्थितीत बरेच लोक जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक घरी व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.

पण ते हे विसरतात की जर तुम्ही जिममध्ये दररोज तासनतास घाम गाळत असाल किंवा घरी व्यायाम करत असाल आणि तुमच्या खाण्याच्या सवयींवर ताबा ठेवत नसाल तर तुमचे सर्व प्रयत्न फेल ठरतील.

त्यामुळे खाद्यपदार्थांचे सेवन करताना विशेष काळजी (Care) घेणे गरजेचे आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना वजन कमी करायचे आहे परंतु ते नाश्त्यामध्ये अशा गोष्टी खातात ज्यामुळे त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. जाणून घ्या वजन कमी करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

Weight Loss Tips
Yoga For Weight Loss : पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही 3 योगासने करा, महिन्याभरात व्हाल स्लिमट्रिम

तळलेले पदार्थ

काही लोक नाश्त्यामध्ये तळलेले पदार्थ (Food) खातात. तुम्हीही या पदार्थांचे सेवन करत असाल तर आजपासूनच त्या खाणे बंद करा. कारण तळलेले अन्न खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

केक किंवा कुकीज

वजन कमी करायचे असेल तर गोड पदार्थ अजिबात खाऊ नका. न्याहारी हे सकाळचे पहिले जेवण आहे. जर तुम्ही सकाळी केक किंवा कुकीज खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याशिवाय जास्त गोड खाल्ल्यानेही तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असते आणि शरीरातील चरबी वाढते.

पॅक्‍ड फूड

अनेकांना पॅक्‍ड फूड खाण्याची सवय असते. इतकं की सकाळी (Morning) उठल्याबरोबर नाश्त्यात या गोष्टींचं सेवन सुरू करतात. या गोष्टी म्हणजे चिप्स आणि स्नॅक्स. जर तुम्ही या गोष्टींचे सेवन केले तर ते तुमच्या लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकते.

पॅकेज केलेला ज्यूस पिऊ नका

ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, पण जेव्हा फळांचा रस ताजा असेल तेव्हाच तो उपयोगी ठरतो. बरेच लोक नाश्त्यात पॅक केलेला ज्यूस पितात. तुम्हीही असे करत असाल तर तसे करणे टाळा. हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ताज्या फळांच्या ज्यूसचे सेवन करा.

Weight Loss Tips
Weight Loss Tips : वेट लॉस करण्यासाठी रात्री रिकाम्या पोटी झोपू नका, हे पदार्थ खा; महिन्याभरात व्हाल स्लिम ट्रिम

नूडल्स खाऊ नका

अनेकांना नूडल्स इतके आवडतात की ते नाश्त्यातही खातात. तुम्हीही हे करत असाल तर करू नका. रिकाम्या पोटी नूडल्स खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यासोबतच वजनही वाढू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com