व्हॉट्सअॅप हे सायबर हॅकर्ससाठी फसवणुकीचे सर्वात मोठे जाळे बनले आहे. हे हकर्स दररोज व्हॉट्सअॅप यूजर्सना मेसेज पाठवून लोकांची फसवणूक (Fraud) करत असतात. अशा स्थितीत, आपण सावध असणे आवश्यक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अलीकडेच, सिक्युरिटी कंपनी McAfee ने त्यांचा ग्लोबल स्कॅम (Scam) मेसेज स्टडी प्रसिद्ध केला आहे. अहवालात स्मार्टफोन यूजर्सना सावध करण्यात आले असून 7 धोकादायक मेसेजची यादी देण्यात जाहिर केली आहे. हे मेसेज सायबर गुन्हेगार डिव्हाइस हॅक (Hack) करण्यासाठी किंवा पैसे चोरण्यासाठी वापरतात. हे मेसेज तुम्हाला एसएमएस आणि व्हॉट्सअॅपवर पाठवले जातात.
अहवालात दावा करण्यात आला आहे की, 82% भारतीयांनी अशा बनावट मेसेज येतात ज्यावर क्लिक करून अनेकजण बळी पडले आहे. ईमेल किंवा सोशल मीडियाद्वारे भारतीयांन दररोज 12 बनावट मेसेज येतात. येथे असे 7 मेसेज ज्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअॅप फ्रॉड जाळ्यात अडकू शकता, याबद्दलची माहिती येथे दिली आहे. जाणून घ्या
बक्षीस जिंकण्याचा संदेश
जर तुम्हाला WhatsApp वर बक्षीस जिंकल्याचा मेसेज आला, तर अशा मेसेजसोबत असलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा सोबत दिलेल्या नंबरवर कॉल करू नका. असे मेसेज चुकीचे किंवा खोटे असू शकतात.
जॉब ऑफर
जर तुम्हाला नोकरीसंदर्भात कोणताही मेसेज आला तर तो खोटा असण्याची शक्यता आहे. कोणतीही व्यावसायिक कंपनी कोणालाही असे मेसेज देत नाही. त्यापासून दूर राहा.
बँकिंग अलर्ट
एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर येणारे बँक अलर्ट मेसेज ज्यामध्ये युजरला मेसेजमधील URL/लिंकद्वारे KYC पूर्ण करण्यास सांगितले जाते, अशा एसएमएसपासून दूर राहा, हे स्कॅम मेसेज आहेत. अशा मेसेजचा उद्देश तुमचे पैसे चोरणे हा असतो.
खरेदी न केलेल्या वस्तूंचे अपडेट
जर तुम्ही कोणत्याही साइटवरून कोणतीही वस्तू खरेदी केली नसेल आणि तरीही तुम्हाला ऑर्डर डिलिव्हरी किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही मेसेज मिळाला असेल, तर अशा मेसेज पाठवणाऱ्याला ब्लॉक करा आणि त्याची तक्रार करा.
Netflix सारखे OTT चे अपडेट्स
सायबर ठग OTT सारख्या अॅप्सच्या सदस्यत्वाबाबत लोकांना अपडेटेड मेसेज पाठवत असतात. सहसा मेसेजमध्ये दावा केला जातो की Netflix आणि Amazon Prime सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे, जे खोटे आहे.
फेक डिलिव्हरी
अनेक वेळा बनावट डिलिव्हरीसाठी एसएमएस आणि व्हॉट्सअॅप मेसेज येतात. यामध्ये तुम्ही ऑर्डर न केलेल्या प्रोडक्टची डिलिव्हरी समाविष्ट आहे. अशा मेसेजपासून दूर राहा.
अॅमेझॉन सिक्युरिटी अलर्ट
दररोज हजारो लोकांना त्यांच्या फोनवर अॅमेझॉन सिक्युरिटी अलर्टचा मेसेज येतो, जो लोकांना अडकवण्याचा सापळा आहे. अॅमेझॉन किंवा कोणतीही कंपनी तुम्हाला अशा अलर्टसाठी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.