Urvashi Rautela
Urvashi RautelaInstagram @urvashirautela

Urvashi Rautela News: आयफोन चोरणाऱ्या व्यक्तीकडून उर्वशी रौतेलाला ई-मेल; ‘मोबाईल परत करेल पण...’

Urvashi Rautela: रविवारी झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये हरवलेला आयफोन सापडला असून आयफोन चोरणाऱ्या व्यक्तीने उर्वशीला ई-मेल केला आहे.
Published on

Urvashi Rautela News

रविवारी झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचला (India Vs Pakistan Match) जाणं बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela) चांगलंच महागात पडलंय. क्रिकेट मॅच पाहण्यासाठी उर्वशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (narendra modi stadium) गेली होती. त्याच ठिकाणी उर्वशीचा आयफोन हरवला होता.

दरम्यान तिचा हरवलेला आयफोन सापडला असून त्या व्यक्तीने उर्वशीला ई-मेल केला आहे. त्या व्यक्तीने अभिनेत्रीकडे फोन देण्याच्या बदल्यात एका मदत मागितली आहे. अभिनेत्रीने त्याच्या मेलचा स्क्रिनशॉट इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Urvashi Rautela
Urvashi Rautela iPhone: भारत Vs पाकिस्तान मॅच पाहायला जाणं उर्वशी रौतेलाला पडलं महागात, २४ कॅरेट गोल्ड आयफोन हरवला

ज्या व्यक्तीला उर्वशीचा मोबाईल सापडला, त्याने ई-मेल करत अभिनेत्रीला माहिती दिली. पण त्याने फोन परत देण्याच्या बदल्यामध्ये एक मदत मागितली आहे. त्याने मागितलेली मदत सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. ‘माझ्याजवळ तुझा मोबाईल आहे. जर तुला तुझा मोबाईल हवा असेल तर, माझ्या भावाला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी मदत कर’, असं त्या व्यक्तीने ई-मेलमध्ये लिहिलं आहे. अभिनेत्रीने इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून त्या ई-मेलवर थंबचा इमोजी पोस्ट करत स्टोरी शेअर केली.

Urvashi Rautela Insta Story
Urvashi Rautela Insta StoryInstagram

अभिनेत्रीचा मोबाईल हरववल्यानंतर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली होती. यावेळी तिने अहमदाबाद पोलिसांना सुद्धा टॅग केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी तिला उत्तर देत मोबाईलचे तपशील मागवले. उर्वशी रौतेलाने ट्वीट केले होते की, “अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा २४ कॅरेटचा रिअल गोल्ड मोबाईल हरवला. कोणाला जर तो मिळाला तर मला सांगा. शक्य तितक्या लवकर माझ्याशी संपर्क साधा.”

Urvashi Rautela
Sunny Deol Birthday: रिअल लाईफमध्येही सनी देओलने गुंडांना शिकवला होता धडा! वाचा मनोरंजक किस्सा

मदत मागताना उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये अहमदाबाद पोलिसांना टॅग केले असून मला मदत हवी आहे असे लिहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशीचा हा २४ कॅरेट सोन्याचा iPhone 14 Pro Max होता. तिच्या मोबाईलला खास डिझाईन करण्यात आली होती. उर्वशीच्या या फोनची किंमत सुमारे ७ लाख ५५ हजार ४३० रुपये इतकी होती. उर्वशी रौतेला एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून ती एक प्रसिद्ध मॉडेल सुद्धा आहे. अभिनेत्री कायमच फॅशनमुळे लाईमलाईट मध्ये राहते.

Urvashi Rautela
UT 69 Trailer Out: अखेर 2 वर्षांनंतर राज कुंद्राने काढला मास्क, 'यूटी 69'च्या ट्रेलर लॉन्चवेळी ढसाढसा रडला; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com