Sunny Deol Birthday: रिअल लाईफमध्येही सनी देओलने गुंडांना शिकवला होता धडा! वाचा मनोरंजक किस्सा

Sunny Deol News: नेहमीच धडाकेबाज ॲक्शन सीनमुळे चर्चेत राहिलेले सनी पाजी रियल लाईफमध्येही तितकेच ॲक्शन हिरो होते.
Sunny Deol Birthday
Sunny Deol BirthdaySaam Tv
Published On

Sunny Deol Birthday

गेल्या काही दिवसांपूर्वी 'गदर २'मुळे सनी देओल प्रचंड चर्चेत आला होता. नेहमीच आपल्या दमदार ॲक्शनमुळे चर्चेत राहिलेल्या सनी देओलचा आज ६६ वा वाढदिवस आहे. ९० च्या दशकामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलेल्या सनी पाजीने आपल्या सिनेकारकिर्दित १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेहमीच धडाकेबाज ॲक्शन सीनमुळे चर्चेत राहिलेले सनी पाजी रियल लाईफमध्येही तितकेच ॲक्शन हिरो होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sunny Deol Birthday
UT 69 Trailer Out: अखेर 2 वर्षांनंतर राज कुंद्राने काढला मास्क, 'यूटी 69'च्या ट्रेलर लॉन्चवेळी ढसाढसा रडला; VIDEO व्हायरल

गेल्या काही दिवसांपूर्वी सनी देओलचा भाऊ बॉबी देओलने 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने एक किस्सा शेअर केला होता. खरंतर सनी पाजीने आपल्या फिल्मी कारकिर्दिमध्ये अनेक ॲक्शन मुव्ही केले आहेत. तर त्यामुळे त्याचा फायदा त्याला त्याच्या रियल लाईफमध्येही झाला.

बॉबी देओल किस्सा सांगितला की, "एकदा सनी त्याच्या मित्रांसोबत पेट्रोल पंपावर थांबला होता. तर तिकडे त्याला ३ ते ४ गुंडांनी घेरलं आणि त्यांच्यात मारामारी झाली. त्यावेळी सनीने त्या सर्व गुंडांचा सामना एकट्याने केला होता. त्याच्यासोबत असलेला एकही मित्रं त्याच्या मदतीला धावून आला नाही. त्या मारामारीमध्ये सनी पाजीने सर्व गुंडांना जबरदस्त मारलं होतं.

सनी देओलचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. पण सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देओल असं आहे. पण त्यांना सनी या नावानेच ओळख मिळाली. बालपणापासून अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या घरातच वावरल्यामुळे त्यांना अभिनयामध्ये फार आवड होती. १९८४ मध्ये ‘बेताब’ मधून रुपेरी पडद्यावर डेब्यू केलं होतं.

डेब्यू करण्याआधी सनी देओलने पूजासोबत गुपचूप लग्न केले होते. ‘बेताब’ रिलीज होण्याआधी सनीच्या लग्नाची बाब लपवून ठेवण्यात आली होती. कारण त्याचा त्याच्या रोमँटिक इमेजवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे ही बाब लपवून ठेवण्यात आली होती. शूटिंगमधून ब्रेक घेत सनी पत्नी पूजाला भेटण्यासाठी लंडनला जायचा. नंतर सनीला माध्यमांसमोर आपण विवाहित असल्याची कबुली द्यावी लागली होती.

Sunny Deol Birthday
Ekda Yeun Tar Bagha Teaser Out: 'एकदा येऊन तर बघा'चा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर आऊट, तुम्ही पाहिलात का?

सनी देओलचे नाव त्या काळातील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले जायचे. पण जरीही असं असलं तरी डिंपल कपाडियासोबतचे नाते फार काळ टिकले. १९८२ मध्ये राजेश खन्ना यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर डिंपल सनीच्या जवळ आली. दोघेही जवळपास ११ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. नंतर हे जोडपे वेगळे झाले. २०१७ मध्ये दोघे पुन्हा एकत्र दिसले होते.

Sunny Deol Birthday
Ye Na Raani Song Out : ‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’ पार्टी साँग रिलीज; तुम्ही गाणं ऐकलंत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com