रविवारी झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याला (India Vs Pakistan Match) जाणं बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela) महागात पडलं आहे. सामना पाहण्यासाठी उर्वशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (narendra modi stadium) गेली होती. त्याच ठिकाणी उर्वशीचा आयफोन हरवल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
उर्वशीने नुकताच केलेल्या ट्विटमध्ये अहमदाबाद पोलिसांना टॅग केले आणि जो कोणी तिचा फोन ट्रेस करण्यात मदत करू शकेल त्याला टॅग करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. अभिनेत्रीच्या पोस्टला उत्तर देताना अहमदाबाद पोलिसांनी आयफोनचा तपशील मागवला आहे. जेणेकरून तिच्या फोनचा शोध घेता येईल. याआधीही नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयफोन हरवल्याची प्रकरणं समोर आली आहेत. याठिकाणी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा फोनही हरवला होता. याआधी आयपीएल सामन्यादरम्यान सुमारे १०० आयफोन चोरीला गेले होते.
उर्वशी रौतेलाने ट्वीटमध्ये लिहिले की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा २४ कॅरेटचा रिअल गोल्ड फोन हरवला. कोणाला तो सापडल्यास कृपया मला मदत करा. शक्य तितक्या लवकर माझ्याशी संपर्क साधा.' मदत मागताना उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये अहमदाबाद पोलिसांना टॅग केले असून मला मदत हवी आहे असे लिहिले आहे. उर्वशी रौतेला १४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचली होती. सामन्यापूर्वी उर्वशी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्या हॉटेलचा व्हिडिओही तिने पोस्ट केला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उर्वशीचा आयफोन हरवल्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अहमदाबाद पोलिसांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे, तर मोठ्या संख्येने वापरकर्ते देखील प्रतिसाद देत आहेत. उर्वशी रौतेलानेही भारत-पाकिस्तान सामना पाहताना एक व्हिडीओ शूट केला होता आणि नंतर तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
उर्वशी रौतेलाला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. तिने अनेकदा क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी हजेरी लावल्याचे याआधी देखील आपण पाहिले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर सामन्याच्या पाच तिकिटांसह एक व्हिडिओही पोस्ट केला होता. आता तिने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयफोन हरवल्याची माहिती दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण अहमदाबाद पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी सोशल मीडियावर मदत मागितल्यामुळे उर्वशीला ट्रोल केले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.