2 Serial Goes Off Air: दोन दिवसांत दोन मालिकांनी घेतला निरोप; चांगल्या मालिका बंद झाल्याने प्रेक्षक नाराज

Colors Marathi Serial: टीआरपीमुळे कलर्स मराठीवरील दोन सिरील बंद झाल्या आहेत.
Yogyogeshwar Jai Shankar And Kasturi Discontinue
Yogyogeshwar Jai Shankar And Kasturi DiscontinueSaam TV
Published On

Yogyogeshwar Jai Shankar And Kasturi Discontinue:

टीव्ही मालिकांचे एक वेगळं विश्व आहे. मालिकेतील कलाकार चित्रपटातील स्टारपेक्षा लोकप्रिय असतात. मालिकेच्या माध्यमातून टीव्ही कलाकार वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांची आणि मालिकेतील कलाकारांची एक जवळीक निर्माण होते. असे असले तरी मालिका आणि कलाकार यांच्यामध्ये टीआरपीची भूमिका खूप मोठी असते.

मालिकांचं आणि त्यातील कलाकारांचं यश टीआरपीवर अवलंबून असतं. टीआरपीमुळेच कलर्स मराठीवरील दोन सिरील बंद झाल्या आहेत. यातील एक मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती.

कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करून या दोन मालिका बंद होत असल्याचे जाहीर केले आहे. २६ जूनपासून सुरू झालेली मालिका 'कस्तुरी' आणि अध्यात्मिक मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर’ने एकाच वेळी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

'आपली सर्वांची लाडकी 'कस्तुरी' आपला निरोप घेतेय. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमासाठी आणि उत्तम प्रतिसादासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.' ''योग योगेश्वर जय शंकर' या मालिकेला तुम्ही भरभरून प्रेम दिलंत. आता ही मालिका तुमचा निरोप घेतेय. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि भक्तीसाठी तुमचे आभार.' असे कॅप्शन देत कलर्स मराठीने मालिका बंद होत असल्याचे सांगितले आहे.

Yogyogeshwar Jai Shankar And Kasturi Discontinue
Kishori Shahane Video: मग आज काय बेत? चुलीवरची भाकरी अन् तळलेले मासे, अभिनेत्रीने चाहत्यांना दिलं आग्रहाचं आमंत्रण

कलर्स मराठीने हे जाहीर करताच प्रेक्षकांनी राग व्यक्त केला. ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही एक अध्यात्मिक मालिका होती. या मालिकेमुळे समाजात सकारात्मकता निर्माण होत होती. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

'कस्तुरी' मालिका बंद झाल्याने देखील प्रेक्षक नाराज आहेत. कलर्स मराठी या मालिकेला न्याय देऊ शकली नाही असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. 'चांगली कथा असलेली मालिका बंद करून उगाच पाणी ओतून मालिका वाढवत आहेत त्या बंद करा.' अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

दर गुरुवारी मालिकांचे टीआरपी रेटिंग जाहीर होते. त्यामुळे कोणत्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात हे कळते. या गुरुवारी आलेल्या टीआरपी रेटिंगमध्ये स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' ही मालिका ऐतिहासिक रेटिंगने पहिल्या स्थानी आहे. तर स्टार प्रवाहवरील १५ मालिका टीआरपी रेटिंगमध्ये टॉपला आहेत.

टीआरपी रेटींगमध्ये कलर्स मराठीवरील मालिका खूप मागे आहेत. त्यामुळेच कदाचित एकाच वेळी दोन मालिका चॅनलला बंद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com