Sugandha Mishra Pregnant: ‘कपिल शर्मा’ फेम कपल लवकरच देणार ‘गुड न्यूज’, बेबीबंप फोटोशूट केले शेअर

Sugandha Mishra Shared On Baby Bump Photos: लोकप्रिय टेलिव्हिजन कपल सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी चाहत्यांसोबत बेबीबंप फोटोशूट शेअर आहेत.
Sugandha Mishra Shared On Baby Bump Photos
Sugandha Mishra Shared On Baby Bump PhotosInstagram
Published On

Sugandha Mishra Sanket Bhosale Announces Pregnancy

लोकप्रिय टेलिव्हिजन कपल सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली. कायमच आपल्या कामामुळे चर्चेत राहणारी ही जोडी सध्या सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच सुगंधा आणि संकेतने सोशल मीडियावर फोटोशूट करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.

Sugandha Mishra Shared On Baby Bump Photos
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Trolled: “आधी गाडी नीट चालवा अन् मग…”, ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोलर्सने घेतली मुग्धा-प्रथमेशची शाळा, नेमकं काय घडलं?

सुगंधा फोटोशूटमध्ये बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. त्यांनी हे मॅटर्निटी फोटोशूट एका बीचवर केलं आहे. अभिनेत्रीचं हे बीचवरील फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे. फोटोशूट दरम्यान, अभिनेत्रीने वाईन कलरचा वेस्टर्न ड्रेस तर संकेतने गुलाबी शर्ट आणि डेनिम जीन्स घालून फोटोशूट केले. बेबीबंप फोटोशूट शेअर करताना सुगंधाने फोटोंना कॅप्शन दिले की, “लवकरच कोणतरी येणार आहे.... आमच्या नवीन एडिशनची प्रतिक्षा करू शकत नाही. कृपया आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहुद्या...”

सध्या अभिनेत्रीचे बेबीबंप फोटोशूट प्रचंड चर्चेत आले आहे. फोटोशूटवर नेहा कक्कर, भारती सिंग, गौहर खान, नुकूल मेहता, किकू शारदा, हितेन तेजवानीपासून जय भानुशालीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे कौतुक केले. त्यासोबतच अनेक चाहत्यांकडूनही अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

सुगंधा आणि संकेत यांनी लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना एकत्र डेट केलं होतं. त्यानंतर त्यांनी २६ एप्रिल २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन वर्षांनंतर ते आई-बाबा होणार आहेत. सुगंधाचा पती पेशाने डॉक्टर आणि कॉमेडियन आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये संकेतने अनेकदा संजय दत्तची जबरदस्त मिमिक्री केली होती. तर सुगंधाबद्दल सांगायचे तर, तिने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जरीही असं असलं तरी सुगंधाची खरी ओळख कपिल शर्मा शोमुळेच झाली.

Sugandha Mishra Shared On Baby Bump Photos
2 Serial Goes Off Air: दोन दिवसांत दोन मालिकांनी घेतला निरोप; चांगल्या मालिका बंद झाल्याने प्रेक्षक नाराज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com