Sakshi Sunil Jadhav
सध्या Jioचे ग्राहक वाढताना आपल्याला दिसत आहेत. कारण जिओकडे ५जी इंटरनेटची सुविधा आहे.
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक भन्नाट प्लान्स आले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत बराच फायदो होऊ शकतो.
पुढील बातमीत आपण एका विशिष्ट रिचार्ज प्लॅनची ओळख करून देणार आहोत. ज्याचा कालावधी ३ महिन्यांचा असणार आहे.
जिओचा हा रिचार्ज प्लान साधारण ८४ दिवसांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन असणार आहे. तुम्हाला यात अनेक फायदे मिळणार आहेत.
जिओचा ८४ दिवसांच्या वॅलिडीटीचा सर्वात स्वस्त प्लॅन फक्त ४४८ रुपयांना आहे. या प्लॅनमध्ये अनेक फायदे मिळतात.
Jioच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना रोमिंगसह अनलिमीडेट कॉलिंगची सुविधा मिळते. जिओच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओएआय क्लाउडसह फ्री ॲप्सचा ॲक्सेस देखील मिळतो.
Jioच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण १००० एसएमएसची मुभा दिली जाणार आहे.
जिओच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये डेटा मिळत नाही, तर तो फक्त कॉलिंगचा प्लॅन आहे. तुम्हाला या जिओ रिचार्ज प्लॅनचा वापर फक्त फक्त कॉलिंगसाठी करता येणार आहे. तसेच ज्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वाय-फायद्वारे इंटरनेटची सोय आहे.