'बिग बॉस 19'च्या घरात अमाल आणि मालतीमध्ये मोठे भांडण झाले आहे.
मालती चहरने अमाल मलिकसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
सोशल मीडियावर अमाल आणि मालतीच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात नवीन आठवड्यात नवीन राडा पाहायला मिळत आहे. अमाल मलिक आणि मालती चहर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. मालतीने (Malti Chahar) अमाल मलिकबद्दल (Amaal Mallik) मोठा खुलासा केला आहे. हे पाहून घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालतीने 'बिग बॉस 19'च्या घरात एन्ट्री घेतल्यापासून ती सर्व सदस्यांशी भांडताना दिसत आहे. मात्र तिने सुरूवातीपासून अमाल मलिकसोबत चांगले नाते ठेवले आहे.
अमाल मलिक आणि मालती चहर हे आधीपासून एकमेकांना ओळखतात. त्यांची चांगली मैत्री देखील आहे. मालती अमालला आधी भेटली आहे. याचा खुलासा मालतीने बिग बॉसच्या घरात केला आहे. व्हिडीओमध्ये अमाल, तान्या, मालती आणि शहबाज एकत्र बसून बोलताना दिसतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत.
अमाल बोलतो की, "मालतीजी सर्वांसमोर पुन्हा माझ्याविषयी बोलत आहेस." शहबाज तान्या विचारतो की, "अमाल काय बोला?" तान्या बोलते की, "अमाल बोला तो मालतीला फक्त एकदा पाच मिनिटांसाठी भेटला आहे..." पुन्हा अमाल बोलतो की, "तुला जगाला दाखवायचे आहे की मी मूर्ख आहे..." तेव्हा मालती बोलते की, "अमालने भेटून मला गाणी ऐकवली आहेत..." त्यानंतर अमाल आणि मालती दोघे एकटे बोलताना दिसतात. तेव्हा मालती बोलते, "मी सर्व सांगू का? माझ्या वडिलांना देखील माहित आहे. आपण कधी भेटलो ते आणि तू कॅमेरासमोर कसं खोट बोलू शकतो? मी २ मिनिटांत हे खरं असल्याचे सिद्ध करू शकते. मूर्ख..."
सध्या सोशल मीडियावर अमाल मलिक आणि मालती चहर यांच्या नात्याविषयी चर्चा पाहायला मिळत आहे. नेटकरी कमेंट्स करत बोलतात की, "नक्कीच काहीतरी गोंधळ आहे," तर दुसरा युजर बोलतो की, "म्हणूनच तू अमालचा स्वेटशर्ट घातला होतास..." आता लोक ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील बोलत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.