
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमधला खेळ चांगला रंगताना दिसत आहे. नुकताच बिग बॉस 19 चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये स्पर्धक एकमेकांशी भांडताना कोणत्याही थराला जात आहेत. स्पर्धक बिग बॉसच्या विरोधात जाण्यासही तयार आहेत. मात्र त्याना बॉसकडून असे उत्तर मिळाले जे पाहून सर्वांचेच मन जिंकले.
बिग बॉस 19 च्या पुढील भागात खूप ड्रामा पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासून पेटलेला हा वाद फारच टोकाला गेला आहे. शोच्या आगामी प्रोमोमध्ये अभिषेक बजाज आणि अमाल मलिक यांच्यात भांडण होताना दिसत आहे यामुळेच इतर स्पर्धक देखील अडचणीत आले आहेत.यांच्या भांडणामुळे आता बिग बॉस मोठा निर्णय घेताना दिसणार आहेत त्यांनी घरातील सदस्यांना फटकारले आहे यामुळे सर्वाचें चेहरे पडले आहेत. अमाल आणि अभिषेकमधील हा वाद अशनूर कौरवरून झाले आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या या प्रोमोमध्ये, अशनूर कौर इतर स्पर्धकांसोबत टास्क खेळताना दिसत आहे. अशनूरने सर्वांना प्रोत्साहित केले. दरम्यान , अभिषेक म्हणाला, अमाल, तुला हे समजले असेल, कारण तू खूप भूंकतोस'यावर अमाल रागावला आणि म्हणाला, तुला जे करायचे आहे ते कर त्यानंतर अभिषेकने अमालला ढकलले, ज्यामुळे दोघांचे भांडण आणखीच वाढले.
अभिषेकच्या या वक्तव्यावर अमालने प्रत्युत्तर देत म्हटले, “मी आधीच सांगितले आहे, तू माझं काय वाकडं करू शकत नाहीस” त्यानंतर अभिषेक आणखीनच आक्रमक झाला आणि म्हणाला, “मी करून दाखवेल.” यामुळे दोघांमध्ये हातामाई होताना दिसली आहे. त्यांच्यात भांडण झालं आणि जोरदार वाद झाला. इतर स्पर्धकांनी या दोघांचा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. यावर बसीर अली रागाने म्हणतो 'जर हे असेच चालू राहिले तर मी पुढे जाणार नाही. झीशान कादरी कॅमेऱ्यातून सांगताना मायक्रोफोन काढून इतर स्पर्धकांनाही असेच करण्यास सांगत आहे.'
यावर गौरव खन्ना बिग बॉसकडे तक्रार करते की सर्वजण मायक्रोफोन काढताना दिसत आहे. नंतर सर्व स्पर्धक सोफ्यावर बसून मायक्रोफोन काढताना दिसत आहे यावर बिग बॉस सर्वांना फटकारतात आणि मायकोफ्रोन काढून तुम्ही कोणाला धमकी देत आहात असे विचारतात?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.