Zubeen Garg Death Case SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zubeen Garg: झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, लोकप्रिय संगीतकार आणि गायिकेला अटक

Zubeen Garg Death Update: गर्ग यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी संगीतकार गोस्वामी आणि गायक अमृतप्रभा यांना पोलिसांनी बोलावले असता त्यांना अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी आणि गायक अमृतप्रभा महंता यांना गुरूवारी अटक केली आहे. गर्ग यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी संगीतकार गोस्वामी आणि गायक अमृतप्रभा यांना पोलिसांनी बोलावले असता त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आमच्याकडे काही पुरावे आहेत' यामुळे संपूर्ण चौकशी करून दोघांनाही अटक केली आहे. तसेच या प्रकरणी आणखी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. गर्ग यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकातून महंता अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. सध्या पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांवर कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गर्ग यांच्या मृत्यूचा तपास सीआयडी पोलिस करत आहेत. दरम्यान झुबीनच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आसाम सरकारने विशेष डीजीपी एमपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या तपासादरम्यान एसआयटीने सिद्धार्थच्या गुवाहाटी इथल्या घरावर देखील छापा टाकला होता. त्यात त्यांनी अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

झुबीन गर्ग यांचा मृत्यू कशामुळे झाला?

माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. श्यामकानू मंहता आणि त्यांच्या कंपनीने आयोजित केलेल्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलनिमित्त ते सिंगापूर येथे गेले होते. गर्ग यांच्या मृत्यूवेळी त्यांच्यासोबत शखरज्योती आणि अमृतप्रभा होते यानिमित्त त्यांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुबीन गर्ग यांनी सेंट जॉन्स बेटाजवळच्या पाण्यातून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आलं होतं. यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेले असता त्यांचा मृत्य़ू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Positive Energy Vastu Tips : गणेशोत्सवात घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 7 सोपे वास्तू उपाय

Maharashtra News Live Update: चिखली दिवाणी न्यायालयासमोर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

Irkal saree Design: सण आणि कार्यक्रमात उठून दिसायचंय? मग, इरकल साडीचे 'हे' ७ सुंदर डिझाईन्स करा ट्राय

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी

Chhagan Bhujbal: मनोज जरांगेंवर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT