
मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट दिल्ली पोलिसांनी उधळला
दोन शूटर राहुल आणि साहिल यांना दिल्लीत अटक
आरोपींनी मुंबई व बेंगळुरूमध्ये मुनव्वरची रेकी केल्याचं उघड
कटाच्या मागे रोहित गोदारा आणि गोल्डी बरार गँग
Munawar Faruqui: स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचं षडयंत्र रचणाऱ्या दोन शुटरला गुरुवारी नवी दिल्लीच्या जैनपूर-कालिंदी कुंज रोडवर चकमकीनंतर अटक करण्यात आली. दोन्ही शूटर्स रोहित गोदारा-गोल्डी बरार-वीरेंद्र चरण गँगचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल आणि साहिल असे दोन्ही आरोपींची नावे आहेत. ते हरियाणाच्या पानिपत आणि भिवानी भागातील रहिवाशी आहेत.
एनडीटीव्ही रिपोर्टनुसार, दिल्ली पोलिसांनी अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वर फारुकी हा गँगस्टर रोहित गोदारा आमि गोल्डी बरारच्या निशाण्यावर होता. कथित धार्मिक भावना दुखावल्याने त्याच्या हत्येचं षडयंत्र रचल्याचं समोर आलं आहे. पोलीस काऊंटर इंटेलिजेन्स यूनिटद्वारे दिल्लीत दोन शूटरच्या मुसक्या आवळल्यानंतर मुनव्वरच्या हत्येचा प्लान उधळून लावला.
आरोपी राहुल आणि साहिलने गोदारा आणि बरार हे विदेशात असल्याचे पोलीस चौकशीदरम्यान कबुल केले. दोघांच्या सांगण्यावरून मुनव्वरला संपवण्यासाठी दिल्लीत थांबल्याचे त्यांनी सांगितलं. दोघांनी काही दिवस आधी मुंबई आणि बेंगळुरुमध्ये कॉमेडिय मुनव्वरची रेकी केली. बेंगळुरुमध्ये हल्लाचा देखील प्रयत्न केला होता.
फारुकी हा २०२४ साली रियालिटी शो बिग बॉसचा विजेता आहे. त्यांचे इन्स्टाग्रॅमवर १४.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. ३३ वर्षीय फारुकी हिंदू देवी-देवतांवर केलेल्या विनोदावरून वादात सापडला होता. फारुकीला २०२१ साली एका प्रकरणात अटक देखील झाली होती. एक महिना तुरुंगात काढल्यानंतर फारुकीची जामीन मिळाला होता. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर हुक्का बारमध्ये टाकलेल्या छापेमारीत कॉमेडियन मुनव्वरला ताब्यात घेतलं होतं. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.