UK Horror : प्रसिद्ध धर्मस्थळाच्या बाहेर मोठा राडा, माथेफिरुच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

UK Attack news : प्रसिद्ध धर्मस्थळाच्या बाहेर मोठा राडा झालाय. माथेफिरुच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय.
UK Attack
UK Horror newsSaam tv
Published On
Summary

यहुदी धर्मस्थळाजवळ अज्ञात व्यक्तीकडून चाकू आणि कारने हल्ला.

हिंसाचारात दोन नागरिकांचा मृत्यू

पोलिसांनी हल्लेखोरावर गोळीबार

नागरिकांना सिनेगॉग परिसरात जाण्यास प्रतिबंध

लंडन : ब्रिटनच्या सिनेगॉगजवळील क्रॅप्सॉलमध्ये बुधवारी एकाने धारदार शस्त्र आणि कारने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले. अज्ञात व्यक्तीने हल्ला करताना कार आणि धारदार शस्त्राचा वापर केला .

न्यूयॉर्क टाइम्सच्या अनुसार, ग्रेटर मॅनचेस्टर पोलिसांनी सांगितलं की, आम्ही एका संशयितावर गोळीबार केला आहे. तर धर्मस्थळाच्या बाहेर संपूर्ण राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हल्लेखोराने यहूदी धर्मस्थळाच्या बाहेर हेतूपूर्वक हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मॅनचेस्टर शहरातील उत्तरमधील सिनेगॉगजवळील क्रॅप्सॉलमध्ये ही घटना घडली. पोलिसाला सकाळी ९.३१ वाजता हीटन पार्क हिब्रू कांग्रेगेशन सिनेगॉग, मिडलटन रोड, क्रंप्सॉलमधील एका नागरिकाने कॉल केला. या नागरिकाने कॉल करत धर्मस्थळाबाहेर राडा झाल्याची माहिती दिली. एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचंही सांगितलं.

UK Attack
Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

नागरिकाने माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली. धर्मस्थळाच्या बाहेर राडा सुरु होता. त्यावेळी घटनास्थळी ९.३८ वाजता पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अज्ञात हल्लेखोरावर हल्लाबोल केला.

UK Attack
Pune Andekar Gang : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात; व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटींची खंडणी

रुग्णवाहिकेचे कर्मचारी त्यानंतर सकाळी ९.४१ वाजता पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. या घटनेत एकूण ४ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत आहे.

UK Attack
KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

हल्लेखोराने केलेल्या चाकू हल्ल्यात नागरिक गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून नागरिकांना यहुदी धर्मस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. आता घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com