'बिग बॉस 19'च्या घरात नवीन प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.
प्रणित मोरे आणि मालती चाहरच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रणित मोरे आणि मालती चाहरचे स्पेशल बॉन्डिंग चाहत्यांना आवडत आहे.
'बिग बॉस 19'च्या घरात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. तान्या-अमाल, अशनूर-अभिषेक, बसीर-फरहाना, बसीर-नेहलनंतर आता अजून एक जोडी 'बिग बॉस 19'च्या घरात बनत आहे. या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिग बॉसच्या घरातील ही जोडी दुसरी-तिसरी कोणी नसून मराठमोळा प्रणित मोरे आणि क्रिकेटपटूची बहीण मालती चाहर आहे.
'बिग बॉस 19'च्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौरव आणि प्रणीत गार्डन एरियात चालत असतात. तेव्हा त्यांच्यामध्ये मालती येते. तेव्हा गौरव बोलतो, "तू मध्ये का येत आहेस?" तेव्हा मालती बोलते, "मी मध्ये येणार..." त्यानंतर तिघे एकत्र चालू लागतात. मात्र प्रणीतमध्येच गौरवला थांबवतो आणि मालती ऐकटी पुढे चालत जाते. जेव्हा तिला हे समजते ती बोलते की, "किती नालायक आहात तुम्ही..." हे ऐकून सर्वजण हसू लागतात.
'बिग बॉस 19'च्या घरात प्रणित आणि मालतीच्या नात्यावरून घरातील सदस्य त्यांना चिडवताना दिसत आहेत. प्रणीत मालतीला त्याचे जॅकेट घालायला देतो. त्यानंतर मालती प्रणितला बाहेर एकत्र बसण्यासाठी बोलावते. त्यावर फरहाना पटकन बोलते की, "नवीन हॅशटॅग बनत आहे..." पुढे मृदुल म्हणतो की, "तू मालतीसोबत मैत्री केली..."
व्हिडीओमध्ये मालती आणि प्रणीत एकत्र बसून खाताना दिसत आहेत. तेव्हा मालती प्रणीतने बनवलेल्या ऑमलेटचे कौतुक करते. घरात नवीन नात्यांची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना ही लव्ह स्टोरी भलतीच आवडत आहे. कमेंट्समध्ये चाहते दोघांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करताना दिसत आहेत. आता या दोघांची मैत्री बिग बॉसच्या घरात कोणते नवीन वादळ घेऊन येते हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.