Rajinikanth-Dhanush : रजनीकांत-धनुषच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी; पोलिसांकडून तातडीने कारवाई,नेमकं प्रकरण काय?

Rajinikanth Dhanush House Receive A Bomb Threat : साऊथ अभिनेते रजनीकांत आणि धनुषच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. यावर पोलीसांनी तातडीने कारवाई केली.
Rajinikanth Dhanush House Receive A Bomb Threat
Rajinikanth-Dhanush SAAM TV
Published On
Summary

रजनीकांत-धनुषच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली.

धमकी मिळताच पोलीसांनी तातडीने कारवाई केली.

बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलवर देण्यात आली.

साऊथ इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता धनुष यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलद्वारे एका अज्ञात व्यक्तींने दिली आहे. ही धमकी तामिळनाडू पोलिस डीजीपी कार्यालयालाच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आली. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

रजनीकांत आणि धनुषला मिळालेल्या धमकीमुळे साऊथ इंडस्ट्रीत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी ईमेल आला. ईमेल वाचताच तेयनमपेट पोलिस आणि बॉम्ब स्क्वॉड पथक रजनीकांत यांच्या घरी पोहचले. पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील घरी तपासणी झाली. तेव्हा रजनीकांत यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कोणतीही अनोळखी व्यक्ती घरात आली नसल्याची माहिती पोलीसांना दिली. त्यामुळे बॉम्ब ठेवल्याची धमकी खोटी असण्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी याच प्रकरणात धनुषच्या घराची देखील तपासणी केली. त्याच्याही घरी कोणताही बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ आढळले नाही. त्यामुळे ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले. चेन्नईमध्ये गेल्याकाही दिवसापासून अशा मोठ्या लोकांना खोट्या धमक्या मिळत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. नेमका ईमेल कोणी, कुठून आणि का केला? याचा शोध घेतला जात आहे.

Rajinikanth Dhanush House Receive A Bomb Threat
तारीख ठरली! 'Bigg Boss 19'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होणार, टॉप 5 फायनलिस्ट कोण?

बॉम्बच्या धमकीमुळे रजनीकांत आणि धनुष यांच्या चाहते चिंतेत आहेत. तसेच ईमेलमध्ये रजनीकांत, धनुष यांच्यासोबतच तमिळनाडू काँग्रेस नेते सेल्वापेरुंथखाई यांच्या किलपक्कम येथील घरी बॉम्ब ठेवण्यात आलेचे म्हटले होते. मात्र पोलीसांनी तेथेही तपास केला, तेव्हा सर्व सुरक्षित आढळले. त्यामुळे पोलीसांनी बॉम्बेची धमकी खोटी असल्याचे सांगितले.

Rajinikanth Dhanush House Receive A Bomb Threat
Ankita Walawalkar : अंकिता-कुणाल बनले मास्टर शेफ; 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये कोकणचा तडका, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com