Mrunal Thakur : "धनुष हा माझा..."; मृणाल ठाकूरने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन

Mrunal Thakur- Dhanush Relationship : सोशल मीडियावर खूप वेळापासून मृणाल ठाकूर आणि धनुषच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मृणाल ठाकूर नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Mrunal Thakur- Dhanush Relationship
Mrunal ThakurSAAM TV
Published On
Summary

मृणाल ठाकूरचा अलिकडेच 'सन ऑफ सरदार 2' रिलीज झाला आहे.

मृणाल धनुषला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

मृणाल ठाकूर धनुषसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur ) चांगलीच चर्चेत आहे. मृणाल धनुषला (Dhanush ) डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अलिकडेच त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. ज्यात दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन बोलताना दिसले. यावर नेटकऱ्यांकडून खूप कमेंट्स आल्या. मात्र आता अभिनेत्री मृणाल ठाकूरने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, मृणाल ठाकूरने सांगितले की, "मला या डेटिंगच्या अफवा खूप मजेशीर वाटल्या. धनुष माझा फक्त एक चांगला मित्र आहे. धनुषला अजय देवगण यांनी 'सन ऑफ सरदार 2'च्या प्रिमियरला आमंत्रित केलं होते. " मृणाल ठाकूरच्या या उत्तरावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्या डेटिंग चर्चा 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या इव्हेंटपासून सुरू झाल्या होत्या. त्यानंतर मृणालच्या बर्थडे पार्टीलाही धनुषची हजेरी होती. तसेच मृणाल ठाकूर धनुषच्या बहि‍णींना देखील सोशल मीडियावर फॉलो करते. यामुळे मृणाल ठाकूर आणि धनुषच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.

वर्कफ्रंट

नुकतीच मृणाल ठाकूर अजय देवगनच्या 'सन ऑफ सरदार 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.'सन ऑफ सरदार 2'मधून अजय देवगन आणि मृणाल ठाकुर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटी आली. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'सन ऑफ सरदार 2' 1 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात भरपूर ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत आहे.

'सन ऑफ सरदार 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'सन ऑफ सरदार 2' हा 2012 साली रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूरसोबत नीरू बाजवा, विंदू दारा सिंह, रवी किशन आणि शरत सक्सेना हे कलाकार पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सन ऑफ सरदार 2' आतापर्यंत 43 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Mrunal Thakur- Dhanush Relationship
Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com