War 2 VS Coolie Collection : रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'वॉर 2' अन् 'कुली' कोणी किती कमावले?

War 2 VS Coolie Box Office Collection Day 9 : 'वॉर 2' आणि 'कुली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली असून एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत. चित्रपटांचे कलेक्शन जाणून घेऊयात.
War 2 VS Coolie Box Office Collection Day 9
War 2 VS Coolie CollectionSAAM TV
Published On
Summary

'वॉर 2' आणि 'कुली' दोन्ही चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज झाले.

'वॉर 2' आणि 'कुली' दोन्ही ॲक्शन चित्रपट आहे.

'कुली' चित्रपटाने 'वॉर 2'ला कलेक्शमध्ये मागे टाकले आहे.

बॉक्स ऑफिसवर 14 ऑगस्टला रजनीकांत यांचा (Rajinikanth ) 'कुली' (Coolie ) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan), कियारा अडवाणी (Kiara Advani)चा 'वॉर 2' (War 2) रिलीज झाला आहे. पहिल्या दिवसापासून 'कुली' चित्रपट 'वॉर 2'ला मागे टाकत आहे. दोन्ही ॲक्शन चित्रपट आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर'चा सीक्वल आहे. 'कुली' चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. दोन्ही चित्रपटांनी 9व्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.

'कुली' vs 'वॉर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 9

रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाने 9व्या दिवशी मीडिया रिपोर्टनुसार, 5.50 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे आतापर्यंत एकूण कलेक्शन 235.15 कोटी रुपये झाले आहे.

हृतिक रोशनच्या 'वॉर 2' चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने 9व्या दिवशी 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानुसार चित्रपटाने 9 दिवसांमध्ये 208.25 कोटी कमावले आहेत.

'कुली'-'वॉर 2' ओटीटी रिलीज

रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट थिएटर गाजवल्यावर अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. चित्रपट सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

साऊथ अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा (JR NTR) 'वॉर 2' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

War 2 VS Coolie Box Office Collection Day 9
Amruta Deshmukh : मालिकांमध्ये हिरो-हिरोईनचे कास्टिंग कसं होते? 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं सांगितलं कटू सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com