Ankita Walawalkar : अंकिता-कुणाल बनले मास्टर शेफ; 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये कोकणचा तडका, पाहा VIDEO

Ankita-kunal Entry In Aamhi Saare Khavayye : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरला 'बिग बॉस' मराठीमुळे खूप लोकप्रियता मिळाली. अंकिता वालावलकर आणि कुणाल 'आम्ही सारे खवय्ये'मध्ये आले आहेत.
Ankita-kunal Entry In Aamhi Saare Khavayye
Ankita Walawalkarsaam tv
Published On
Summary

अंकिता वालावलकरला सर्वत्र 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखले जाते.

अंकिता वालावलकर आणि कुणाल 'आम्ही सारे खवय्ये'मध्ये आले आहेत.

अंकिता आणि कुणाल 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये मास्टर शेफ झाले आहेत.

मराठी लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा 'आम्ही सारे खवय्ये' हा कुकिंग शोला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार येतात आणि आपली पाककला दाखवतात. आता 'आम्ही सारे खवय्ये'च्या घरात आपले पाक कौशल्य दाखवण्यासाठी महाराष्ट्राची आवडती कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि तिचा नवरा कुणाल भगत आला आहे. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आणि कुणाल भगतची 'आम्ही सारे खवय्ये'मध्ये धमाकेदार एन्ट्री होते. दोघेही छान रोमँटिक डान्स करताना दिसतात. अंकिताने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. त्यावर मॅचिंग ज्वेलरी, मिनिमल मेकअपमध्ये ती दिसत आहे. तर कुणालने ब्राऊन कलरचा आउटफिट आणि पांढरे शूज घालून लूक पूर्ण केला आहे. दोघे एकत्र खूपच भारी दिसत आहे. शोमध्ये एकमेकांची मजा घेताना दिसत आहेत.

'आम्ही सारे खवय्ये' शोचा होस्ट संकर्षण कऱ्हाडे अंकिता आणि कुणालला विचारतो की, "कोण जास्त फूडी आहे?" यावर उत्तर देत अंकिता म्हणते की, "मी फूडी आहे. तो फक्त नाव ठेवतो..." त्यानंतर अंकिता किचनमध्ये आपल्या कोकण स्टाइलमध्ये एक झणझणीत पदार्थ बनवताना दिसते. तेव्हा संकर्षण कऱ्हाडे म्हणतो की, "फार तिखट जरी झालं तर कोकणात नारळच्या बागा आहेत. यावर कुणाल, संकर्षण आणि अंकिता तिघेही हसू लागतात.

व्हिडीओला एक खास कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अंकिता कुणालला दाखवणार कोकणचा झणझणीत ठसका!" आता 'आम्ही सारे खवय्ये' च्या या नवीन भागात काय काय होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठीमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Ankita-kunal Entry In Aamhi Saare Khavayye
तारीख ठरली! 'Bigg Boss 19'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होणार, टॉप 5 फायनलिस्ट कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com