Shreya Maskar
दिवाळी म्हटले की घरी पाहुणे आलेच. खास पाहुण्यांसाठी घरीच उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून रव्याची खीर बनवा. रव्याची खीर बनवायसा सिंपल आणि खायला टेस्टी लागते.
रव्याची खीर बनवण्यासाठी रवा, साखर, काजू, मनुका, तूप, दूध, बदाम, पिस्ता आणि हिरवी वेलची इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात केशरचा देखील समावेश करू शकता.
रव्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बदाम, पिस्ता, काजू आणि मनुका तळून घ्या. ड्रायफ्रूट्स जळणार नाही याची काळजी घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये तूप टाकून त्यात रवा मंच आचेवर गोल्डन फ्राय करा. खीर बनवताना बारीक रव्याचा वापर करा. म्हणजे खीर टेस्टी बनते.
पॅनमध्ये दूध आणि साखर घालून एक उकळी काढून घ्या. सर्व मिश्रण करून ५-१० मिनिटे शिजवा. रवा कच्चा राहायला नको.
मिश्रणात भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि केशर टाकून २-३ मिनिटे खीरला उकळी येईपर्यंत शिजवून घ्या. खीर सतत ढवळत रहा. जेणेकरून ती पॅनला चिकटणार नाही.
शेवटी गॅस बंद करून तुम्ही यात वेलची पावडर घाला. खीर खंड हवी असेल तर २०-३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून द्या.
तुम्हाला थोडी घट्ट खीर हवी असेल तर त्यात तुम्ही खवा देखील टाकू शकता. यामुळे रव्याची खीर आणखी स्वादिष्ट बनते.